ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री

जितेंद्र सहारे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

औद्योगीक जिल्हा म्हणुन ओढख असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी करण्यासाठी श्रमीक एल्गार संघटनेने आंदोलने केली. या आंदोलनाची दखल घेत अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन १ एप्रिल २०१५ ला जिल्हयात दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागतही करण्यात आले. मात्र काही महिन्याच्या बंदीनंतर लगेच जिल्हयात अवैध दारू विक्रीने डोके वर काढले.

चिमूर - चंद्रपुर जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी मोठा गाजावाजा करीत दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीने जिल्हयातील फक्त परवाना धारक दुकानातील दारू विक्री बंद झाली. मात्र दारूबंदी नंतर जिल्हयातील गावा गावात अवैध दारूविक्रीला उधान आले. चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे होणाऱ्या अवैध दारू विक्रीने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतीच्या मार्फतीने मुख्य रस्त्यावर फलक लावुन दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे.

औद्योगीक जिल्हा म्हणुन ओढख असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी करण्यासाठी श्रमीक एल्गार संघटनेने आंदोलने केली. या आंदोलनाची दखल घेत अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन १ एप्रिल २०१५ ला जिल्हयात दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागतही करण्यात आले. मात्र काही महिन्याच्या बंदीनंतर लगेच जिल्हयात अवैध दारू विक्रीने डोके वर काढले. या अवैध दारू विरोधात जिल्हयात पोलीस कार्यवाह होत असल्या तरी प्रशासनाने अवैध दारूबाबत ठोस उपाययोजना न केल्याने चंद्रपुर जिल्हयातील दारूबंदी फसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

चिमूर तालुक्यात असलेल्या व शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वहानगाव येथे मागील अनेक महिन्यापासुन अवैध दारूचा महापुर सुरू आहे. या साठी ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरीकांनी तक्रार केल्या या तक्रारीवर तात्पुरती कार्यवाही करून अवैध दारू विक्रेत्यांना सोडण्यात येते.  हेच दारू विक्रेते गावातील सरपंच सदस्य व पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात. त्यामुळे वहानगाव येथील नागरीक या गावात होणाऱ्या अवैध दारू विक्रीने त्रस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रेते जिवावर उधार होऊन हा व्यवसाय करीत असल्याने व यांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांची हिमंत वाढून ते सैराट सुटले आहेत. त्यामुळे गावातील महीला व पदाधिकारीही या अवैध दारू विक्रेत्याच्या दहशतीत जगत आहेत.

या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या वहानगाव येथील नागरीकांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासणाच्या हतबलतेने अवैध दारू विक्रीचे गावातुन पुर्ण उच्चाटन करण्यासाठी गावातील अवैध दारू विक्री सात दिवसात पुर्णता बंद करा नाहीतर ग्रामपंचायतच फलक लावुन मुख्य रस्त्यावर दारू विक्री करेल असा प्रशासणाला निर्वाणिचा इशारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन सरपंच कलाबाई जुमनाके, उपसरपंच प्रशांत कोल्हे सदस्या अर्चणा थुटे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.