आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

नंदकिशोर वैरागडे
शुक्रवार, 23 जून 2017

अतिरक्तत्रावामुळे भास्कर चौके यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील आमदार कृष्णा गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यांनी आज (शुक्रवार) सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

आमदार गजबे यांच्या संपर्क कार्यालयाच्या दारातच सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास चौके यांनी स्वतःजवळील सर्व्हिस राइफलने डोक्यावर गोळी झाडून घेतली. ते तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना गंभीर अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

अतिरक्तत्रावामुळे भास्कर चौके यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. विवाहबह्य संबंधांतून आत्महत्येचा प्रयत्न झाली असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.