आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - वारंवार फोनवर कोणाशी बोलते, शॉर्ट कपडे का घालते, गॅलरीत का उभी राहते? या आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. 

नागपूर - वारंवार फोनवर कोणाशी बोलते, शॉर्ट कपडे का घालते, गॅलरीत का उभी राहते? या आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. 

कोमल संजय सराटे (वय १७, रा. अभ्यंकरनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. माहितीनुसार, संजय सराटे हे प्रॉपर्टी डीलर असून त्यांना कोमल आणि चैताली दोन मुली आहेत. कोमल ही बारावीत, तर चैताली दहावीत आहे. कोमल घरात मोठी असल्याने तिच्यावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी पालकांची धडपड सुरू होती. तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून तिच्या वागण्यावर पालकांचा वॉच होता. मात्र, तिला पालकांची बंधने झुगारून जगायला आवडत होते. सांगितलेले ऐकत नसल्यामुळे किंवा योग्य वागत नसल्यामुळे पालक तिच्यावर ओरडत होते. कोमलने या सर्व त्रासाला कंटाळून रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची मृत्यूची नोंद केली.

सध्याच्या युगात पालक आणि पाल्यांमधील संवाद लोप पावत आहे. पैसे कमविण्याच्या नादात पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. केवळ जाब विचारण्यापुरताच संवाद त्यांच्यात होत आहे. जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर अशा घटनांना कारणीभूत आहे. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो. पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि मनमोकळा होण्यास वाव दिल्यास घरातील वातावरणात आणि विचारांमध्ये फरक पडू शकतो. पालकांच्या रागापोटी मुलांच्या आत्महत्यासारख्या घटना म्हणजे ऑनर किलिंगची रिॲक्‍शन देणाऱ्या असतात. 
- डॉ. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ)