यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

घाटंजी तालुक्‍यातील भंबोरे येथे वीज पडून एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शिवाय एक बैलही ठार झाला आहे.

घाटंजी (जि. यवतमाळ) - घाटंजी तालुक्‍यातील भंबोरे येथे वीज पडून एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शिवाय एक बैलही ठार झाला आहे.

भंबोरा येथील शेतकरी वसराम धावजी राठोड (वय 55) व त्यांची पत्नी शोभा वसराम राठोड (वय 50) हे शेतातील कामे करून घरी परतत असताना रस्त्यात वीज पडली. त्यामध्ये वसराम यांचा जागीच मृत्यू झाला. तर शोभा गंभीर जखमी झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वीज पडल्याने एक बैलही ठार झाल्याचे वृत्त आहे.

टॅग्स