वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल

सचिन शिंदे
गुरुवार, 22 जून 2017

स्वच्छता व त्याच्या जागृतीबद्दलच्या जाहीराती पाहिल्या की सगळच कस थक्क करायला होत. पण स्वच्छता मनात असेल तर ती कृतीत यायला वेळ लागत नाही त्यात गावही सहभागी व्हायला मुहूर्त लागत नाही. त्याची प्रचीती आली, ती पुणे जिल्ह्यातील ऊरळी कांचनमध्ये.

स्वच्छता व त्याच्या जागृतीबद्दलच्या जाहीराती पाहिल्या की सगळच कस थक्क करायला होत. पण स्वच्छता मनात असेल तर ती कृतीत यायला वेळ लागत नाही त्यात गावही सहभागी व्हायला मुहूर्त लागत नाही. त्याची प्रचीती आली, ती पुणे जिल्ह्यातील ऊरळी कांचनमध्ये.

गावात स्वच्छतेचा जागर कृतीतून साकारलेला दिसतो. 2015 ला पालखी सोहळा येथे आला त्यानंतरच्या स्थीतीबाबतची कल्पना डोक्यात होती. मात्र यंदी ती कुठेच दिसली नाही. पालखी सोहळ्याचा तब्बल दोन तासांच्या विश्रांतीचा काळ येथे गेला. मात्र पालखी पुढे यवतला गेली त्यानंतर अवघ्या तासाभरात गाव चक्क चकाचक दिसत होत. त्याला कारणीभूत गावात गावकऱ्यांनी राबवलेली स्वच्छता मोहिम. काय झाल. कस झाल. ह्याचा शोध घेण्याची माझी उत्सुकता यावेळी जागी झाली. समोरून नुकतीच पंचायतीची स्वच्छता करणारी लोक गेली होती.

पालखी येण्याआधी तळावर आलो होतो. त्यावेळी पंचायतीचे कर्मचारी स्वच्छता करत असल्याचे दिसले होते. रूढ मनान त्याकड बघून दुर्लक्ष केले होते. पालखी गेल्यानंतरची स्वच्छता पाहून येण्यापूर्वीच्या स्वच्छतेची बाजू लक्षात आली. मग ठरवल खोलात जायच. त्यावेळी लक्षात आल याचा पाया जुलै 2016 ला घातला गेलाय. त्यावेळची पालखी येथून मार्गस्थ झाली की त्यानंतर काही सेवाभावी लोकांच्या स्वच्छतेचा विचार मनाला शिवून गेला. अवघ्या चार लोकांनी ठरवल गाव स्वच्छ करायच. त्यांनी भेटल त्याला सांगितल. सुरवातीली त्यांना वेड्यात काढल. काहींनी विरोध केला. आता मात्र त्या मोजक्या लोकांच्या स्वच्छतेचा मुलमंत्र गावात चळवळ बनला आहे. 300 लोक येथे सफाई करतात, प्रत्येक रविवारी दोन तास न चुकता. यात उद्योजक, वकील, डाॅक्टर, इंजिनीअर, व्यापारी, उद्योजक आणि राजकीय मतभेद विसरून सारेच राजकीय पदाधिकारीही यात सहभागी होतात. पक्ष, गट तट न बघता स्वच्छता करणारे सारे हात गावाला आरोग्यदायी ठरत आहेत.

गावच्या भुमीला राष्ट्रपीता महात्मा गांधीजींच्या पदस्पर्श आहे. त्यांचे अनुयायी मनीभाई देसाई यांनी तो आदर्श जपला होता. येथे आश्रमही आहे. त्या दोन महान विचारवंताचाच विचार जपल्याचीच साक्ष गावातील नव्या पिढीने दिली आहे. गावान ठरवल्याने एका वर्षात गावात स्वच्छता नांदली. गावात सत्तर टक्के प्लॅस्टीक मुक्तीही झाली. अशाच एकोप्याने गाव वाढल्यास ते जिल्ह्यातच नव्हे तर राज्य अन देशातही गौरवास पात्र ठरेल.... अन ते ठरावे यासाठीही एकजुटीच्या त्याना शुभेच्छा...