
पुणे : लॉकडाऊनचा काळ आहे. अशात दररोज टीव्हीवर वाढलेल्या कोरोना पेशंट्सचा काउंट ऐकून दिवसेंदिवस चिंता वाढतेच. आधी वाटलेलं आठ पंधरा दिवस हा लॉकडाऊन चालेल आणि मग सगळं सुरळीत होईल. पण आज अडीच तीन महिने होत आले. लॉकडाऊन सुरूच आहे. लॉकडाऊन असल्याने सगळं कुटुंब २४ तास घरात, त्यामुळे आधी घरात जेवढा भाजीपाला किंवा फळं लागायची त्यापेक्षा दुप्पट आता लागतायत.
बाहेर काहीका चालेना, घरातल्या फर्माईशी वाढायला लागल्यात. अशात रोज बाहेर जाणं, भाजीपाला आणणं फळं आणणं योग्य नाही. त्यामुळे दररोजच्या भाजीपाल्याचा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. तेलं, डाळी, पिठं या गोष्टी एकदा आणल्या की घरात ठेऊ शकतो . पण भाजीपाल्याचं तसं नाही. भाजीपाला फार दिवस साठवता येत नाहीआणि भाज्या फ्रेश नसतील तर पुन्हा दुसरंच काही होऊ नये याची भीतीही असतेच.
मोबाईलवर थोडं सर्च केलं, घरी भाजीपाला कुणी आणून देतं का याची माहिती घेतली. पण परत त्याची क्वालिटी कशी असेल हा प्रश्न मनात होता. शेवटी सेवन मंत्रा ही वेबसाईट मला सर्च करताना आढळली. कोरोनाच्या काळात माझ्या मनात भाजीपाला खरेदी करताना भीती होती. काही याबाबत मला प्रश्न होते, या सर्व प्रश्नांचे उत्तर मला सेवन मंत्रा वेबसाईटवर मिळाले. एकदा इथून ऑर्डर करून पाहिलं. दोन दिवस अगोदर ऑर्डर केल्यानंतर ठरलेल्या वेळेला म्हणजे सकाळी बरोबर साडे आठ वाजता मला डिलिव्हरी मिळाली. वेबसाईट वर बुकिंग करण्यापासून डिलिव्हरीपर्यंतचा अनुभव सुलभ आणि सुखावणारा वाटला. भाजीपाल्याचा दर्जा अगदी जसा सांगितला होता तसाच होता.
महत्त्वाची बाब म्हणजे इथून येणाऱ्या भाज्या या थेट शेतकऱ्यांकडून जमा केल्या जातात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला जमा केल्यानंतरनंतरही त्यांच्यातला फ्रेशनेस योग्य पद्धतीने जपला जातो. भाज्यांचं ग्रेडिंग होतं आणि माझ्यासारख्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार त्याचं पॅकिंग केलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या काळात सॅनिटायझेशन आणि हायजिन फार महत्त्वाचं आहे. हे सर्व पाळून मगच या भाज्या घरी पोहोचवल्या जातात... त्यामुळे मी तर ठरवलंय.. लॉकडाऊनमध्ये आणि त्या नंतरही भाज्या मागवणार फक्त सेवन मंत्रा डॉट कॉमवरून.. हा अनुभव आहे ''आमचे ग्राहक अश्विनी गीते'' यांचा .
आपल्या जर भाजीपाला आणि फळे हवे असतील तर www.sevenmantras.com या वेबसाइटला भेट देऊन आपली बास्केट बुक करता येईल. बास्केट बुक केल्यानंतर ठरलेल्या दिवशी भाजीपाल्याची किंवा फळांची बास्केट आपल्या दारात पोहोच केली जाईल. बास्केटचे 'पाच' पर्याय उपलब्ध आहेत. दर मंगळवार, गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस वितरण होईल. त्यापूर्वी दोन दिवस अगोदर आपली ऑर्डर नोंदवावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.