राज्यात मिरची प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये

प्रतिनिधी
शुक्रवार, 31 मे 2019

राज्यात मिरची प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये
नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. २८) हिरवी मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. तिला ५००० ते ६५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये होता. सोमवारी (ता. २७) हिरवी मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. तिला ४००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० होता. रविवारी (ता. २६) हिरवी मिरचीची आवक १२८ क्विंटल झाली. तिला ५५०० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० होता. शनिवारी (ता. २५) हिरवी मिरचीची आवक ३१२ क्विंटल झाली. तिला ४४०० ते ५५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता. शुक्रवारी (ता. २४) हिरवी मिरचीची आवक १४५ क्विंटल झाली. तिला ४५०० ते ५५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४८०० होता.

गुरुवारी (ता. २३) हिरवी मिरचीची आवक ११५ क्विंटल झाली. तिला ४२०० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत हिरवी मिरचीची आवक कमी जास्त होत आहे. गेल्या तीन दिवसांत आवक मंदावल्याचे दिसून आले. आवकेप्रमाणे बाजारभाव काढले जात आहेत.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ४५०० ते ५५०० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची १७५ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ मे रोजी १८४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ मे रोजी मिरचीची आवक २२३ क्‍विंटल तर दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

१६ मे रोजी २०७  क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ४००० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ मे रोजी हिरव्या मिरचीची आवक १७२ क्‍विंटल तर दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ मे रोजी २०२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ३००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

अकोल्यात प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये
येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. ३०) हिरवी मिरची ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. मिरचीची आवक दोन टनापेक्षा अधिक झाली होती, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. 

सध्या येथील बाजारात मिरचीचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहेत. मिरचीची आवक प्रामुख्याने अकोला जिल्हा वगळता इतर भागांतून होत आहे. गेल्या काही दिवसांत मिरचीचा दर वाढत आहे. साधारणतः महिनाभरापूर्वी मिरचीचा दर हा ३००० रुपयांपर्यंत क्विंटलला मिळत होता. 

गुरुवारी मिरचीची आवक दोन टनापेक्षा अधिक झाली होती. घाऊक विक्रीचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये किलोपर्यंत होता. आणखी काही दिवस मिरचीच्या दरांमध्ये स्थिरता राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून क्विंटलला ५००० ते ६००० असा दर मिळाला आहे. मागील तीन सप्ताहांच्या तुलनेत मिरचीचे दर तेजीत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 

२३ मे रोजी हिरव्या मिरचीची २३ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ४००० ते ५००० असा दर मिळाला आहे. नऊ मे रोजी हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ५००० असा दर मिळाला आहे. या तुलनेत गुरूवारी मिरचीस क्विंटलमागे एक हजार रुपये वाढ झाली आहे. कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातून मिरचीचे आवक होत आहे. हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये प्रतिकिलो प्रमाणे केली जात आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीला चांगली मागणी राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. मिरचीची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली. या सप्ताहात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहात हिरव्या मिरचीची आवकही तशी जेमतेमच राहिली. रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. पण उठाव चांगला राहिला. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये दर मिळाला. 

मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पंधरवड्यातही आवक अशीच राहिली. पण दर पुन्हा तेजीतच राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्यात पुढे वाढच होत गेली. सध्या मिरचीला मागणी आणि दरही चांगला आहे.

चिपळूणमध्ये प्रतिक्विंलट ४००० ते ६००० हजार रुपये
येथील बाजारात हिरवी मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे होलसेल बाजारात ४००० हजार ते ६००० हजार रुपये प्रतिक्विंटल हिरव्या मिरचीचा दर होता. 

मध्यंतरी हिरवी मिरचीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली होती. कमी आवकेमुळे मिरचीचे दर वाढले होते. पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार रुपये दराने मिरची मिळाली होती. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही मिरचीचे दर वाढले होते.

दररोज २०० क्विंटल मिरचीची आवक होते. होलसेल व्यापाऱ्यांना दुय्यम दर्जाची मिरची मिळत असल्यामुळे त्यांनी मिरचीची उचलही थांबवली होती. चार दिवसांपासून मिरचीची आवक वाढली आहे. चांगल्या दर्जाची कमी किमतीत मिरची मिळत असल्यामुळे दरही स्थिर झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1500 to Rs 6000 per quintal in chili