Agro: संभाव्य मूल्यसाखळ्यांमध्ये अधिक उत्पादन क्षमता

प्रत्येक मूल्यसाखळीसाठी किमान २०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
Fruits
FruitsFruits

अपेक्षा फलोत्पादन क्षेत्राच्या : भाग २

नाशिक : राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील द्राक्षे, डाळिंब, केळी, लिंबू, आंबा, खरबूज, काजू, चिंच, सीताफळ, बोर, आवळा, कांदा, टोमॅटो, बटाटा, ढोबळी मिरची, भेंडी, कोबी व फ्लॉवर, फुले, हळद, आले, मिरची, पेरू या प्रमुख पिकांमधून सध्या मिळणारे उत्पन्न ५० हजार ७०३ कोटींच्या आसपास आहे. सध्याची आकडेवारी पाहता, राज्यात फळपिकनिहाय २९५ मूल्यसाखळ्या तयार होऊ शकतात. त्यात दोन लाख ३३ हजार कोटी उत्पन्नाची क्षमता आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने राज्य सरकारला सादर केलेल्या माहितीतून हे चित्र पुढे आले आहे. (Agriculture Fruit Production)

त्रिस्तरीय रचना आवश्‍यक

‘अमूल''च्या धर्तीवर त्रिस्तरीय रचना स्वीकारण्याची आवश्‍यकता आहे. ‘सह्याद्री‘ने मूल्यसाखळ्यांची रचना कशी असू शकेल याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार एका मूल्यसाखळीमागे किमान २० शेतकरी उत्पादक कंपन्या असतील.एका शेतकरी उत्पादक कंपनीत एक हजार शेतकरी असतील. साधारणतः सहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असू शकतील. एका मूल्यसाखळीतून दीड हजार कोटींचे उत्पन्न साध्य करणे शक्य आहे.

Fruits
म्हाडा व टिईटी प्रकरण; महत्वाच्या दलालांना सायबर पोलिसांकडून बेड्या

प्रत्येक मूल्यसाखळीसाठी किमान २०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. २९५ मूल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक आवश्‍यक असेल. त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.काढणी पश्‍चात सुविधांचे एकात्मिक मॉडेल उभे करावे लागेल.

- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com