नगरमध्ये ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन’ आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नगर - शेतकऱ्यांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला नगरमधील सावेडीतल्या जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून (ता. २३) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा या प्रदर्शनातून प्रयत्न आणि मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवस (रविवारपर्यंत) हे प्रदर्शन सुरू राहणार असून, सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सकाळ-ॲग्रोवनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून यंदापासून नगरध्ये सकाळ-ॲग्रोवनतर्फे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. 

प्रदर्शनात ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेज इंडस्ट्रीज, ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था सहभागी होत आहेत. शहर, उपनगरांच्या मध्यवस्तीत असलेल्या सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर उद्या (शुक्रवारी) हे प्रदर्शन सुरू होणार असल्याने तीन दिवस (रविवारपर्यंत ता. २५) शेती शेतीशी नाळ असलेल्या लोकांची येथे मांदियाळी असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना, अधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार, कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग आणि परिसंवादाच्या दालनात नामवंत तज्ज्ञांचे, प्रगतिशील शेतकऱ्यांचे दररोज मागदर्शन, हे हेतू घेऊनच हे प्रदर्शन होत आहेत. उद्या सकाळी दहा वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, "आत्मा''चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे व "सकाळ''चे निवासी संपादक ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news agrowon agriculture exhibition