कापूस निर्यातीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता

रॉयटर्स
सोमवार, 4 जून 2018

देशातून २०१७-१८ या हंगामात कापसाची गेल्या चार वर्षांतील विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. कापूस निर्यातीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्के वाढ होऊन ती ७५ लाख गाठींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. जागतिक बाजारात भडकलेल्या किमती आणि कमजोर रुपया यामुळे देशातील कापूस निर्यातीला बळ मिळाले आहे.

कापूस निर्यातीसाठी मोठी मागणी असली तरी हंगाम संपत आल्याने चांगल्या गुणवत्तेच्या कापसाची उपलब्धता मर्यादीत आहे, असे गणात्रा म्हणाले. पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाम हे देश भारतीय कापसाचे प्रमुख खरेदीदार आहेत. 

दरम्यान, देशाची कापूस आयात मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या हंगामात कापूस आयात गेल्या वर्षीच्या ३० लाख गाठींवरून १२ लाख गाठींवर उतरण्याची शक्यता आहे, असे गणात्रा यांनी स्पष्ट केले. देशात प्रामुख्याने अमेरिका आणि इजिप्तमधून लांब धाग्याच्या कापसाची आयात केली जाते.

निर्यातीत झेप
     गेल्या हंगामातील कापूस निर्यातः ५८.२ लाख गाठी
     यंदाच्या हंगामातील अपेक्षित कापूस निर्यातः ७५ लाख गाठी
     यंदा आतापर्यंत झालेली निर्यातः ६३ लाख गाठी

 आयात घटणार
     गेल्या हंगामातील कापूस आयातः ३० लाख गाठी
     यंदाच्या हंगामातील अपेक्षित कापूस आयातः १२ लाख गाठी

शिल्लक साठा रोडावणार
     स्थानिक मागणी आणि निर्यात वाढल्याने कापसाचा शिल्लक साठा कमी होण्याची चिन्हे.
     कापूस मागणीत यंदा ५.३ टक्के वाढ होण्याची शक्यता.
     शिल्लक साठा २० लाख टन राहण्याची शक्यता.
     गेल्या दहा वर्षांतील नीचांकी शिल्लक साठा.

Web Title: agro news cotton export 30 percent increase