‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १५’ला उत्साहात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे - उल्हासदायक आणि निसर्गरम्य वातारणात आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवरील ‘सेकंड होम'चे स्वप्न साकार करणाऱ्या ‘सकाळ-ॲग्राेवन’च्या ‘ग्रीन हाेम एक्स्पाे सिझन १५’ ला शनिवारी (ता. १२) उत्साहात प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागांतील असंख्य लाेकशन्स एकाच छताखाली उपलब्ध अाहेत. शनिवारची सुटीची संधी साधत अनेक कुटुंबीयांनी सेकंड हाेम शाेधण्यासाठी एक्स्पोमध्ये हजेरी लावली हाेती.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचच्या मैदानावर ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १५'चे उद्‌घाटन शनिवारी (ता.१२) मॅजेस्टिक रिएलिटीजचे संचालक जकी खान, वास्तुपूर्तीचे संचालक नितीन माेरे, ४२ ग्रीन पार्कचे संचालक सुमित शाह आणि केतन गुगळे यांच्या हस्ते झाले. एक्‍स्पोमध्ये राज्यातील प्रमुख शहरांभोवतीचे फार्म हाउस, बंगलो प्लॉट्‌स, वीकेन्ड होम्स व संबंधित सेवांची माहिती ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वाई, पाचगणी, महाबळेश्वर, काेकण, सासवड, पुणे, उरुळीकांचन, वेल्हे, भाेर, मुळशी, लवासा राेड, शिरवळ, हिंजवडी, कामशेत, जेजुरी, वाघाेली, बारामती, येवलेवाडी, शिरवळ, दापाेली आदी ठिकाणांच्या विविध पर्याय उपलब्ध आहेत.

रविवारी (ता.१३) एक्स्पोचा शेवटचा दिवस असून, सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत विनामूल्य खुले आहे. 

सकाळ ‘ॲग्राेवन’च्या ग्रीन हाेम एक्स्पाेला नेहेमीच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आमच्या साईटची चांगली विक्री हाेते. आम्ही नेहेमीच या एक्स्पाेमध्ये सहभागी हाेण्यासाठी उत्सुक असताे. 
- नितीन माेरे, व्यवस्थापकीय संचालक, वास्तुपूर्ती हाउसिंग प्रा. लि.

आज पहिला दिवस असला तरी सेकंड हाेमसाठी उत्सुक असणाऱ्या अनेक कुटुंबीयांनी आमच्याकडे चाैकशी केली.
- दीपक बाेगील, चिंतामणी लॅण्डमार्क

Web Title: agro news green home expo season 15 start