देशातील रब्बी पेरणी माघारली

वृत्तसंस्था
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नवी दिल्ली - देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८) रब्बी पेरणी ४४२.२९ लाख हेक्‍टरपर्यंत पोचली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गतवर्षी या कालावधीत रब्बी पेरणीचे क्षेत्र ४४८.४८ लाख हेक्‍टर होते. लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत अद्याप सुमारे ६ लाख हेक्‍टरने कमी आहे. 

यंदा चांगल्या मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गहू, हरभरा ही खरिपातील प्रमुख पिके आहेत. भाताची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत भाताची लागवड ८.९८ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा ती ११.८७ लाख हेक्टरवर पोचली आहे. कडधान्यांची लागवड १२७.६२ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी ती ११९.७३ लाख हेक्‍टर होती. 

गहू, तेलबिया लागवडीत घट
शुक्रवारअखेर गव्हाची लागवड १९०.८७ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी या कालावधीत ती २०३.५६ हेक्‍टर होती. तेलबियांची लागवड गतवर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी तेलबियांची या कालावधीत ७२.१६ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा ती ६७.७९ लाख हेक्‍टरवर आली आहे. भरडधान्यांची लागवड गतवर्षी ४४.०५ लाख हेक्‍टरवर झाली होती. ती या कालावधीत ४४.१४ हेक्‍टरपर्यंत झाली आहे. 

रब्बी पेरणी (लाख हेक्‍टरमध्ये) 
पीक    २०१६-१७    २०१७-१८ 
गहू    २०३.५६    १९०.८७ 
भात    ८.९८    ११.८७ 
कडधान्य    ११९.७३    १२७.६२ 
तेलबिया    ७२.१६    ६७.७९  
भरडधान्य    ४४.०५    ४४.१४  
(स्रोत : केंद्रीय कृषी मंत्रालय, ८ डिसेंबरपर्यंत) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news Rabi sowing of the country is retrograde