तंत्र बायोमास पायरोलिसीसचे...

डॉ. वैभवकुमार शिंदे
सोमवार, 24 जुलै 2017

पायरोलिसीस म्हणजे सेंद्रिय घटकांचे उष्ण रासायनिक प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत केले जाणारे विघटन. ज्यामुळे जैव तेल (बायोआॅईल), घन (बायोचार) आणि वायू (गॅस) यांचे उत्पादन मिळते.  

पायरोलिसीस प्रक्रियेच्या साहाय्याने जैवभाराचे वाहून नेण्यायोग्य द्रवामध्ये रूपांतर करता येते. यास जैव तेल असे म्हणतात. याची ऊर्जा घनता ही जैविक भारापेक्षा पाचपट अधिक असते.  पायरोलिसीस म्हणजे सेंद्रिय घटकांचे उष्ण  रासायनिक प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत केले जाणारे विघटन. यामध्ये जैव तेल (बायोआॅईल), घन (बायोचार) आणि वायू (गॅस) यांचे उत्पादन मिळते.  

पायरोलिसीसचे फायदे -
जैविक घटकांपासून निर्माण होणारे पृष्ठभागीय आणि जमिनीतील पाण्याचे प्रदूषण, जैविक संकट, दुर्गंधी, अपायकारक वायू असे जमिनीसाठी घातक प्रदूषण रोखले जाते.
जैविक घटकांचे मोकळ्या हवेत केले जाणारे ज्वलन आणि त्यामुळे होणारे वायू प्रदूषण रोखले जाते.
दगडी कोळसा, डिझेल, पेट्रोल अशा खनिज इंधनास एक सक्षम व उत्तम पर्यायी उत्पादन मिळते.ज्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी प्रदूषण होते.
पायरोलिसीसचे प्रकार :

पारंपरिक पायरोलिसीस -
 ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत आणि तापविण्याच्या अत्यंत कमी प्रमाणात (०.१ ते  १० अंश सेल्सिअस प्रतिसेकंद) जैविक घटकांचे औष्णिक विघटन केले जाते.

जलद पायरोलिसीस -
उच्च तापमानात (४०० ते ५५० अंश सेल्सिअस) घडणारी प्रक्रिया असून जैविक भार जलद गतीने तापवला जातो (१० ते २०० अंश सेल्सिअस प्रतिसेकंद). जैविक भाराचे विघटन घडवून वाफ, वायू आणि कोळसा तयार होतो. 

वाफेचे घनीभवन करून जैव तेल (बायोआॅईल) मिळवले जाते. या प्रक्रियेतून ५० ते ८५ टक्के द्रव जैव तेल, १५ ते २५ टक्के घनकोळसा आणि १० ते २० टक्के घनिभवन न होणारे वायू मिळतात. हे जैवभार कोणता आणि कशा प्रकारचा वापरला आहे यावर अवलंबून असते. कोणतेही अवशेष शिल्लक ठेवले जात नाहीत. 

रासायनिक घटकयुक्त जैव तेल हे इंधनासाठी वापरले जाऊ शकते. यातून तयार होणारा कोळसा मातीच्या संवर्धनासाठी फायदेशीर आहे. तसेच गॅसचा या प्रक्रियेत पुन्हा इंधन म्हणून वापर करता येतो.

फ्लॅश पायरोलिसीस -
या प्रक्रियेत अतिजलद गतीने औष्णिक विघटन घडवले जाते. ज्यात तापवण्याचे प्रमाण १००० अंश सेल्सिअस प्रतिसेकंदपेक्षा अधिक असते. तयार होणाऱ्या वाफेला खूप कमी वेळेसाठी साठवले जाते. त्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनात द्रव पदार्थ अधिक असतो.

पायरोलिसीस प्रक्रिया घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारे रिअॅक्टर ः
बाब्लिंग फ्लुइडाइस्ड बेड
सर्क्युलेटिंग फ्लुइडाइस्ड बेड
रोटेटिंग कोन अँड व्हॅक्युम रीअक्टर
आगार रीअॅक्टर

जगभरातील संशोधक काड, टरफल, मक्याचे कणीस, चहाचे अवशेष, बदामाचे टरफल, मोहरीच्या बिया, तंबाखूच्या काड्या, पाने, कापूस पऱ्हाटी, सूर्यफुलाचे टाकाऊ अवशेष, लाकूड आणि वन अवशेषांचा वापर करून पायरोलिसीस प्रक्रियेचा अभ्यास करीत आहेत. 

- डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१
(सहायक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

Web Title: agro news technique biomass pairolysis