कोल्हापुरात गवार तेजीत

राजकुमार चौगुले 
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

कोल्हापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीस दहा किलोस ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची आवक घटल्याने दराची तेजी कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ओल्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. ओल्या मिरचीचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. वांग्याची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते २४० रुपये दर मिळाला.

महिन्यापूर्वी वांगी व टोमॅटोच्या दरात चांगलीच तेजी होती; परंतु गेल्या महिन्यापासून आवकेत वाढ झाल्याने दराची तेजी कायम राहू शकली नाही. टोमॅटोच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेन पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने टोमॅटोस दहा किलोस ५० ते १२० रुपये दर मिळत आहे. ओल्या वाटाण्याची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक होत आहे. 

ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. वाटाण्याचा दर स्थिर आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज चौदा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. कोथिंबिरीच्या दरात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेवगा शेंगेच्या आवकेत चांगलीच घट झाली आहे. शेवगा शेंगेस दहा किलोस ५०० ते ७०० रुपये दर मिळाला. 

कांदा पातीला दररोज एक ते दीड हजार रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही चांगलीच वाढ झाल्याने मेथीचे दरही कमी झाले. मेथीस शेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाला. पालकला पेंढीस १५० ते  २०० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दररोज शंभर बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १५ ते ३० रुपये दर मिळाला. डाळिंबाची दररोज वीस ते पन्नास कॅरेट आवक झाली. डाळिंबास किलोस १० ते ४० रुपये दर होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Cluster Beans kolhapur