कापसात तेजीचा माहाैल

मनीष डागा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  कापसाच्या दरात तेजीचा माहौल आहे. अमेरिकी वायदे बाजारामध्येही (आयसीई) कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतातील बाजारपेठेतही तेजीचे संकेत मिळत आहेत. देशातील वायदे बाजारात (एमसीएक्स) कापसाचे दर चढे आहेत. अमेरिकी वायदे बाजारात पुढच्या टप्प्यात दर कमी झाले तर भारतातील स्थानिक बाजारपेठेत दर स्थिर राहतील, अशी चिन्हे आहेत.

अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अहवालानुसार अमेरिकेत यावर्षीचे कापूस उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा पाच लाख गाठी कमी राहण्याचा अंदाज आहे, तर ओपनिंग स्टॉक (गेल्या वर्षीचा शिल्लक साठा धरून उपलब्ध माल) १० लाख गाठींनी कमी राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादनात आणखी घट होईल, अशी स्थिती आहे. पाकिस्तानने काही अटींवर भारतातून होणाऱ्या कापूस आयातीवरची बंधने हटवली आहेत. त्यातच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला आहे. आयात महाग झाल्याने पाकिस्तानात कापसाचे दर अचानक वाढले आहेत. गेल्या आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात सातत्याने तेजी दिसून आली.

भारतात स्थानिक बाजारात कापसाचे दर चढे आहेत. मागणी अधिक आणि तुलनेने विक्री कमी अशा स्थितीत कापसाच्या दरात प्रति खंडी १००० रुपये वाढ झाली आहे. कापसाच्या धाग्याच्या लांबीपेक्षा आता प्रतवारी आणि ताकद यावर  दर अवलंबून आहेत. बहुतांश मिलधारक आणि निर्यातदार यांच्याकडे कापसाची उपलब्धता कमी आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कापसावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बोंडअळीच्या प्रश्नावर तातडीची उपाययोजना काय करावी, याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार, वस्त्रोद्योग आणि बियाणे कंपन्यांनी त्वरेने हालचाल करण्याची गरज आहे.

(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून कॉटनगुरूचे  प्रमुख आहेत.)
www.cottonguru.com

Web Title: agrowon news cotton