'ग्रामीण पर्यटनाचा शाश्‍वत विकास गरजेचा'

प्रतिनिधी
Sunday, 17 December 2017

पुणे - भारतात निसर्गसाैंदर्याबराेबरच जैवविविधता आणि एेतिहासिक वास्तूंचा प्रचंड वारसा असताना, आपली आेळख श्रीमंत देशात गरीब माणसे राहतात, अशी आहे. ही आेळख बदलण्यासाठी देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा ८.५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनाचा शाश्‍वत विकास हाेणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 

वनराई संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विकासासाठी शाश्वत पर्यटन' या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. १६) झाले. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, कॉसमॉस बॅंकेचे संचालक कृष्णकुमार गाेयल, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्‍वस्त नितीन देसाई, विशेषाकांचे संपादक अमित वाडेकर, राेहिदास माेरे आदी उपस्थित हाेते. 

डॉ. माशेलकर म्हणाले, की ग्रामीण भागातील पर्यटन विकासातून तेथील कामगारांना राेजगार उपलब्ध होईल. त्याच त्याच पर्यटन स्थळांमुळे पर्यटनाला मर्यादा आल्या आहेत. ग्रामीण पर्यटनासाठी माेठ्या संधी असून शाश्‍वत ग्रामीण पर्यटन विकासासाठी स्थानिकांची सहमती आणि सहभाग गरजेचा आहे. विकासासाठी शाश्वत पर्यटन या विशेषांकातील माहिती साेशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पाेचविण्याची गरज आहे.    

श्रीपाल सबनीस म्हणाले, की अनियंत्रित पर्यटनाचा परिणाम स्थानिक पर्यावरणावर हाेत असून, ग्रामीण आणि निसर्ग पर्यटन करताना शाश्‍वत पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. ग्रामीण पर्यटनातून शेतकरी आणि स्थानिकांना राेजगार मिळणार असून, ग्रामीण पर्यटन स्थळे एकमेकांना गुंफली तर शहरांकडे वाढणारे स्थलांतर राेखता येईल. यामुळे ग्रामीण जीवन अर्थपूर्ण हाेईल. परिणामी शहरात वाढणाऱ्या राजकीय हाणामाऱ्या आणि विद्वेषातून निर्माण हाेणारे गैरव्यवहार कमी हाेणार आहे. आजचा विशेषांक पर्यावरण, पर्यटन क्षेत्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणारा आहे.

यावेळी रवींद्र धारिया, कृष्णकुमार गाेयल, अमित वाडेकर यांनी मनाेगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जगताप यांनी केले. तर आभार विश्‍वस्त राेहिदास माेरे यांनी मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news rural tourism raghunath mashelkar