esakal | स्वराज ट्रॅक्टरच्या नव्या ६५ ते ७५ एचपी रेंजचे लॉंचिंग
sakal

बोलून बातमी शोधा

स्वराज ट्रॅक्टरच्या नव्या ६५ ते ७५ एचपी रेंजचे लॉंचिंग

स्वराज ट्रॅक्टरच्या नव्या ६५ ते ७५ एचपी रेंजचे लॉंचिंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महिंद्रा ग्रुप अंतर्गत स्वराज ट्रॅक्टर विभागाने ६० ते ७५ एचपी क्षमतेची नवी ट्रॅक्टर रेंज विकसित केली आहे.  या रेंजमधील स्वराज ९६३ एफई या पहिल्या ट्रॅक्टरचे लॉंचिंग बुधवारी (ता. ७) मोहाली येथील कंपनीच्या प्रक्षेत्रामध्ये करण्यात आले. हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा ट्रॅक्टर असून, लवकरच टू व्हिल आणि फोर व्हिल ड्राईव्ह पर्यायामध्ये स्वराजच्या ८७५ डिलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल.  

१९७४ मध्ये पंजाब येथे स्थापन करण्यात आलेल्या स्वराज ट्रॅक्टरने आजवर १.३ दशलक्ष ट्रॅक्टरची विक्री केली आहे. हा ब्रॅण्ड फेब्रुवारी २००७ पासून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपसोबत जोडला गेला. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वराजची ट्रॅक्टर रेंज ही १५ एचपी ते ६५ एचपी होती.  नव्या सेरीजच्या लॉंचिगनंतर ती वाढून ७५ एचपीपर्यंत जाणार आहे. स्वराज डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन पोपली आणि संशोधन, विकास विभागाचे जितेंद्र चावला यांनी नव्या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये सांगितली. स्वराज ९६३ एफई हा ६० ते ७५ एचपी विभागातील पहिला ट्रॅक्टर असून, ताकद, विश्वासार्हता आणि सुलभता या कसोटीवर उतरणारा आहे. मोठे शेतकरी, शेतकरी कंपन्या यांच्या गरजांची पूर्तता करतो.पहिल्या टप्प्यामध्ये या ट्रॅक्टरची उपलब्धता पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये होईल.     

महिंद्राच्या कृषी उपकरणे विभागाचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, की स्वराज ट्रॅक्टर निर्मितीमध्ये गुंतलेले ७५ टक्के कर्मचारी हे शेतकरी कुटुंबातील असून, नव्या स्वराज ९६३ एफई ट्रॅक्टरची निर्मिती ही शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी झाली आहे. 

स्वराज ९६३ एफई
   २२८ nH टॉर्क (१५ टक्के अधिक) ताकदवान इंजिन.
   प्रति मिनिट फेऱ्यांची संख्या कमी (२१००), 
   क्रिप स्पीड ः किमान वेग ०.५ कि.मी. प्रति तास (रिपिंग, मल्चिंग, काढणी यांसारख्या कामांसाठी उपयुक्त)
   १२ इंच इतका मोठा वेगळा पीटीओ क्लच, सिंक्रोमेश ट्रान्समिशन, वेगाने तीन पर्याय (१२ पुढे आणि २ मागे), अचूक व वेगवान हायड्रोलिक.
   नवीन डिजीटल डॅशबोर्ड सर्व्हिस रिमायंडरसह.
   विविध सुरक्षा साधने ः सुरक्षा स्वीच, कास्टेड फ्रंट अॅक्सल ब्रॅकेट, डिफरन्शिअल लॉक.
   किंमत ७.४० लाख (एक्स शोरूम) पासून पुढे.

loading image