बांबू लागवडीतून दिला वयाच्या 65 व्या वर्षी सकारात्मक शेतीचा संदेश

विवेक मेटकर
रविवार, 31 मार्च 2019

चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65 व्या वर्षी सकारात्मक शेतीचा संदेश देण्यासाठी मेहनत घेत आहेत.

संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65 व्या वर्षी सकारात्मक शेतीचा संदेश देण्यासाठी मेहनत घेत आहेत.

सेवानिवृत्ती मध्येही शेती मध्ये नवीन काही करून दाखविण्याची  सातव याची  इच्छाशक्ती या भागातील शेतकऱ्यासाठी वरदान ठरावी. या भागात सातत्याने पावसाळा कमी होत आहे. परिणाम भूगर्भातील जलपातळी झपाट्याने खोल गेली आहे. म्हणून आर्थिक उत्पन्न घटले आणी पारंपरिक पीक पद्धतिचा वाढता खर्च याचा ताळमेळ उरला नाही. निसर्गाच्या भरवश्यावर ची शेती मारक ठरल्याने नव्या पीक पद्धतीची निवड करणे आर्थिक समृद्धी साठी गरजेचे ठरणारे आहे. 

हाच धागा पकडून संग्रामपूर येथील विजय रामेश्वर सातव यांनी चंद्रपूर मधील शेती मध्ये सुरू झालेला प्रयोग गावात करण्याचे धाडस केले आहे . विजय सातव हे महावितरण मध्ये नोकरीला आहेत . तर त्याचे वडील सेवानिवृत्त लाईनमन आहेत.चंद्रपूर भागात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू च्या शेतीवर जोर देऊन शेतात लागवड होणाऱ्या बांबू ला गवताची मान्यता दिली आहे.विजय यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने  नेटवरून बांबू च्या जातीची माहिती घेतली. या मध्ये चायना मधील मोसा ही जात आणि आपल्याकडील बाबूसा बालकुवा ही जात समांतर असल्याचे समजून घेतले . आणि चायना मधून मोसाचे 100 ग्रॅम बियाणे 5 हजार 300 रुपयाला खरेदी केले. जानेवारी 2019 मध्ये ह्या बियाणे चे रोपे तयार करण्यासाठी संग्रामपूर येथे विजय याचे वडील रामेश्वर सातव यांनी 40 बाय 50 च्या जागेत हिरव्या नेट च्या सहाय्याने 40 हजार रुपयात ग्रीन हाऊस तयार केले. त्या मध्ये मोसा जातीचे 1800 रोपे लागवड योग्य तयार झाले आहेत. सोबतच बांबू च्या मधोमध निलगिरी चे झाडे ही लावण्याचे नियोजन सातव यांनी केले आहे.
 वरील दोन्ही जातीचे बांबूला जगभरात मागणी आहे. 

बांबू शेती बाबत.....
विजय सातव यांनी सांगितले नुसार वरील दोन्ही जाती चे बांबूला मोठी मागणी आहे.या पासून कापड,प्लायवूड, कागद, इथिनाल, बायोगॅस, बायो डिझेल,असे अनेक उपयोग साठी या बाबू ची मागणी आहे. लागवड पासून चवथ्या वर्षांपासून कटाई करता येते. जवळ पास 70 वर्ष हे पीक एकदा लागवड झाली  की घेता येते. ओला बाबू तीन हजार रुपये टनाने कंपनी घेतात.एक एकर मध्ये 1200 झाडे 4 बाय 8 मध्ये बसतात.या बांबू चे मधात निलगिरीची झाडे ही लावणार आहेत. म्हणजेच एकदा लागवड झाली की 70 वर्ष उत्पादन घेता येते. गट शेती मध्ये 100 एकर शेतीवर या बांबू ची लागवड झाल्यास तालुका ठिकाणी प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतात. बाबू चे उत्पादन सुरू झालेवर भंडारा, बल्लारशहा, पुणे आदी ठिकाणी विक्री करता येऊ शकते. त्या साठी व्यापारी पण खरेदी साठी शेतात येतात.अशी ही बहु लाभ दायक बांबू ची शेती खारपान पट्ट्यात यशस्वी झाल्यास भविष्यात संग्रामपूर ठिकाणी यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीचा मानस असल्याचे विजय सातव यांनी सांगितले.
 
शेतीत प्रयोगातून वेगळेपण असावे!
शेती करताना आपण काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा मार्ग शोधावा. या हेतूने रामेश्वर सातव यांनी हैद्राबाद वरून प्रयोग म्हणून रिसर्च जाती चे महाकाय मोसंबी चे फळ असणारे झाड पाच वर्षात चागले डेव्हलप केले. आणि आज सदर झाड लदबद फळांनी बहरलेले दिसत आहे. म्हणजेच त्या जातील इकडचे वातावरण पोषक असल्याचे दिसत आहे. शेतकऱयांनी शिक्षणाचा फायदा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी करावा . आणि त्यातून परिस्तिथी वर मात करून नफयाची शेती कशी करता येईल
यावर भर देण्याची सक्त गरज असल्याचे रामेश्वर सातव यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bamboo Planting Agriculture Success Motivation Rameshwar Satav