मत्स्यव्यवसायासाठी शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य - जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नगर - ग्रामीण युवकांनी व शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे, असे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

राहुरी येथे संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या सभागृहात शनिवारी (ता. ७) केज कल्चर (पिंजरा पद्धती) मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे श्री. जानकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्‍त सुजाता साळुंखे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्‍त ना. वि. भादुले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

जानकर म्हणाले, की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक तलाव, तळी, पाझरतलाव, धरणे आहेत. जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून शेततळ्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे. अशा शेततळ्यांत जर शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन केले तर मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे ग्रामीण युवक व शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. राज्याला सद्यःस्थितीत अन्य राज्यांतून मत्स्यबीजाची आयात करावी लागते, मात्र मत्स्यबीज उत्पादन वाढवून राज्याला मत्स्यबीजामध्ये स्वंयपूर्ण करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Government Support for Fisheries says mahadev jankar