ब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे. यंदाच्या गाळप हंगामात येथील ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे जात आहे, तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी थांबल्याने येथील साखर उत्पादन यंदा ४९.४ टक्क्यांनी घटले आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ९ लाख ५८ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १८.९ लाख टन उत्पादन झाले होते. 

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे. यंदाच्या गाळप हंगामात येथील ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे जात आहे, तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी थांबल्याने येथील साखर उत्पादन यंदा ४९.४ टक्क्यांनी घटले आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ९ लाख ५८ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १८.९ लाख टन उत्पादन झाले होते. 

ब्राझील हा जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत साखर निर्यातीतही ब्राझील देशाचा अव्वल क्रमांक आहे. येथील कारखाने साधारणपणे मार्च किंवा एप्रिलमध्ये गाळप सुरू करतात आणि आॅक्टोबरमध्ये गाळप संपते. देशातील साखर उत्पादनात ९० टक्के हिस्सा असणाऱ्या दक्षिणमध्य ब्राझिलमध्ये २४८.६ लाख टन ऊस गाळप झाले 
आहे. ऊस गाळपात गेल्या हंगामाच्या तुलनेत १७.५ टक्के यंदा घट झाली आहे. येथी ऊस उत्पादक पट्ट्यात गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने ऊस काढणीला विलंब होत आहे. त्याचाही परिणाम गाळपावर झाला आहे.

अनेक कारखाने बंद
ब्राझीलमधील गाळप हंगाम साधारणपणे आॅक्टोबरमध्ये संपतो. परंतु तरीही काही कारखाने ऊस शिल्लक असल्याने गाळप उशिरापर्यंत सुरू ठेवतात. सध्या येथील ५२ साखर कारखान्यांनी २०१८-१९ चा गाळप हंगाम आटोपला आहे. येथील साखर कारखान्यांनी एप्रिल ते आक्टोबर या काळात ५ हजार ८३ लाख टन ऊस गाळप केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गाळप ४.४ टक्क्यांनी कमी आहे. यंदा २४३.५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी २६७ लाख टन उत्पादन झाले होते.

६४ टक्के उसाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी  
दक्षिण मध्य ब्राझिलमधील साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामात साखरेचे ३६० लाख टन उत्पादन घेतले होते. तर गेल्या हंगामात एप्रिल ते आॅक्टोबर या काळात इथेनॉलचे उत्पादन दोन हजार २६६ कोटी लिटर झाले होते. यंदा याच काळात दोन हजार ७२६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. ब्राझीलमध्ये गाळप झालेल्या एकूण उसापैकी केवळ ३५.९ टक्के ऊस साखर उत्पादनासाठी वापरण्यात आला आहे, तर ६४.१ टक्के ऊस इथेनॉल प्रकल्पात वापरण्यात आला आहे. गेल्या वर्षी जवळपास निम्मा ऊस साखर उत्पानदासाठी वापरण्यात आला होता.

इथेनॉल निर्मितीवर भर
साखर दराचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने आणि इंधनाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्राझिलने यंदा इथेनॉल निर्मितीवर अधीक भर दिला आहे. साखरेच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती अधिक परवडत असल्याने आणि दरही चांगला मिळत असल्याने कारखान्यांनी अधीका अधिक ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविला आहे. त्यामुळे ब्राझीलमधील साखर उत्पादन यंदा निम्म्यावर आले आहे. इथेनॉलकडे कारखान्यांच्या कलामुळे साखर उत्पादनात मोठी घट आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil Sugar Production 50 percent less