esakal | राज्यात वांगी ४०० ते ३००० रुपये क्विंटल

बोलून बातमी शोधा

brinjal

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) वांग्यांची आवक २७१ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल ३००० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यात वांगी ४०० ते ३००० रुपये क्विंटल
sakal_logo
By
प्रतिनिधी

नाशिकमध्ये ६०० ते ३००० रुपये दर
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) वांग्यांची आवक २७१ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल ३००० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ३) वांग्याची आवक २६४ क्विंटल झाली. त्यांना किमान ७०० ते २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४२८ रुपये होता. सोमवारी (ता. २) वांग्यांची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होता. रविवारी (ता. १) वांग्यांची आवक २६४ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता. 

शनिवारी (ता. २९) २४५ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. शुक्रवारी (ता. २८) आवक २५२ क्विंटल झाली. त्या वेळी ८०० ते २८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० होता. गुरुवारी (ता. २७) वांग्याची आवक २५९ क्विंटल झाली. त्यास ७५० ते २७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्यांची आवक सर्वसाधारण होती. आवकेच्या तुलनेत दरांत चढ उतार होताना दिसून येत आहे.

औरंगाबादमध्ये प्रतिक्‍विंटलला  ४०० ते ६०० रुपयांचा दर 
औरंगाबाद :
 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) वांग्यांची आवक ४३ क्‍विंटल झाली. त्यांना ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ फेब्रुवारीला वांग्यांची आवक ४९ क्‍विंटल, तर दर किमान ६०० ते कमाल ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ फेब्रुवारीला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना ६००  ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ फेब्रुवारीला ५४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ फेब्रुवारीला ४३ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी वांग्यांना किमान ४०० ते कमाल ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ फेब्रुवारीला २९ क्‍विटंल आवक झालेल्या वांग्यांना ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ मार्चला वांग्याची आवक ३२ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २ मार्चला ४० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ मार्चला वांग्याची आवक ४० क्‍विंटल झाली. दर किमान ५०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

सोलापुरात सर्वाधिक २००० रुपये
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांना चांगला उठाव मिळाला. त्यांना प्रतिक्विंटलला सर्वाधिक २००० रुपये मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात वांग्यांची रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्यांची आवक तशी जेमतेम प्रतिदिन २० ते ३० क्विंटल अशी होती. तर, दर किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये होता. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही दराची स्थिती थोड्याफार फरकाने अशीच होती. आवक मात्र थोडीशी वाढली. 

प्रतिदिन ५० ते ८० क्विंटलपर्यंत आवक होती. तर, दर प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा होता. १००- २०० रुपयांच्या फरकाने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

परभणीत ६०० ते १२०० रुपयांचा दर
परभणी  - येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ५) वांग्यांची ६५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ६०० ते कमाल १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील स्थानिक परिसरातील सिंगणापूर, तरोडा, बोरवंड, पोखर्णी, कोक आदी परिसरातून वांग्यांची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी वांग्यांची ४० ते ६५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी ६०० ते २५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ५) वांग्यांची ६५ क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर ६०० ते १२०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ५० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात ११०० ते १८०० रुपये दर
जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लहान काटेरी वांग्यांची आवक मागील १५ ते २० दिवसांत कमी झाली आहे.  गुरुवारी (ता. ५) १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ११०० ते कमाल १८०० रुपये असा मिळाला. 

आवक यावल, एरंडोल, जळगाव, जामनेर आदी भागांतून आहे. सध्या उठाव चांगला असल्याने दरही सुधारले आहेत. 

सोलापुरात सर्वाधिक २००० रुपये
सोलापूर  -
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्यांना चांगला उठाव मिळाला. त्यांना प्रतिक्विंटलला सर्वाधिक २००० रुपये मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात वांग्यांची रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही वांग्यांची आवक तशी जेमतेम प्रतिदिन २० ते ३० क्विंटल अशी होती. तर, दर किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये होता. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही दराची स्थिती थोड्याफार फरकाने अशीच होती. आवक मात्र थोडीशी वाढली. 

प्रतिदिन ५० ते ८० क्विंटलपर्यंत आवक होती. तर, दर प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा होता. १००- २०० रुपयांच्या फरकाने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.