चेरी टोमॅटोचा ‘फुले जयश्री’ वाण विकसित

अनिल देशपांडे
मंगळवार, 5 जून 2018

राहुरी, जि. नगर - येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोचा फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचा वाण नुकताच प्रसारित केला आहे. महाराष्ट्रात बाजारपेठेत हा टोमॅटो आणणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. 

नेहमीच्या फळभाज्यांसोबत परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाल्यांनाही चांगली मागणी राहते. अनेकवेळा अतिरिक्त उत्पादनामुळे नेहमीचा टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो. त्या तुलनेत चेरी टोमॅटो या ‘एक्झॉटिक’ भाजीपाला या प्रकारात येणाऱ्या टोमॅटोस पॅकिंगच्या माध्यमातून तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची संधी असते. तारांकीत हॉटेल्सलमधून सॅलडच्या हेतूने चेरी टोमॅटोला चांगली मागणी असते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात गेल्या सात वर्षांपासून या वाणावर संशोधन सुरू होते. निवड पद्धतीने हा वाण विकसित केला असल्याचे संशोधक डॉ. ज्ञानेश्र्वर क्षीरसागर यांनी सांगितले. टोमॅटोचा आंबट गोड स्वाद असणाऱ्या या वाणाचे फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम आहे. हेक्टरी सरासरी उत्पादन ५३.३१ टन मिळते. विद्राव्य घटकाचे प्रमाण त्यात ६.३२ टक्के आहे.

विषाणूजन्य रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे. हा वाण पश्र्चिम महाराष्ट्रासाठी शिफारशीत केला आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांत चेरी टोमॅटोला चांगली मागणी आहे. खरीप व रब्बी हंगामांबरोबरच शेडनेटमध्ये उन्हाळी हंगामातही चेरी टोमॅटो घेता येतो.
कृषी विद्यापीठात शेडनेटमध्ये या प्रयोगाचे निष्कर्ष समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वाणाच्या विविध संशोधन केंद्रांवर विविध हंगामांत चाचण्या घेतल्या असून, त्याचेही निष्कर्ष चांगले दिसले आहेत. या वाणाचे बियाणे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत.  

या संशोधनामुळे शेतकऱ्यांना चेरी टोमॅटोचा पर्यायी खात्रीशीर वाण उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cherry tomato phule jayashri