कांदा मार्केटवर पुरवठावाढीचा दबाव 

onion
onion

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाप फलोत्पादन अनुमानानुसार यंदाचे कांदा उत्पादन २२८ लाख टनावरून २६७ लाख टनापर्यंत वाढणार आहे. पीक वर्ष २०१९-२० मध्ये वरील आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण कांदा उत्पादनात १७ टक्क्यांची वाढ दिसून येते. 

एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत रब्बी कांद्याची उपलब्धता असते. केंद्रीय कृषी खात्याकडील माहितीनुसार २०१९ मध्ये खरीप व लेट खरीप हंगाम मिळून ५५ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. २६७ लाख टनातून ५५ लाख टन उत्पादन वजा जाता २१२ लाख टन उत्पादन हे रब्बी हंगामातून मिळाले आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामातून १५८ लाख टन उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत यंदाचे रब्बी उत्पादन वाढ ३४ टक्क्यांनी अधिक आहे. 

एक एप्रिलपासून रब्बी आवकेचा प्रारंभ होतो. देशांतर्गत खप, निर्यात आणि स्टॉक या तीन घटकांकडे कांदा वळता होतो. हंगामाच्या प्रारंभाच्या पहिल्या दोन्ही महिन्यात लॉकडाऊनमुळे देशांतर्गत खप बऱ्यापैकी घटला आहे. सरासरीच्या तुलनेत वरील दोन्ही महिन्यांत निर्यातीचा आकारही घटल्याची शक्यता आहे. 

२०१८-१९ आर्थिक वर्षांत २४.२ लाख टन कांदा निर्यात झाला होता. तर गेल्या आर्थिक वर्षांत (२०१९-२०) मध्ये जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार ९.९ लाख टन कांदा निर्यात झाला. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटचे दोन महिने तर चालू आर्थिक वर्षांतील (२०२०-२१) पहिल्या कांदा निर्यातीची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्टोबरमध्ये नवे मार्केटिंग वर्ष सुरू होईल. तेव्हाच्या स्थितीसंदर्भात काही आकडे पाहू. 
केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या पाहणीनुसार कांद्याचा मासिक खप ११.६ लाख टन आहे. यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत सरासरी मासिक दीड लाख टन कांदा निर्यात अपेक्षित धरली आहे. म्हणजेच या सहा महिन्यात ९ लाख टन कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे. निर्यात व देशांतर्गत खप मिळून, एप्रिल ते सप्टेंबरमध्ये ७८.६ लाख टन कांद्याचा खप होईल. 

 बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या ऑक्टोबरला खरीप कांद्याचा नियमित आवक हंगाम सुरू होईल तेव्हा ९० लाख टनाचा सरप्लस असेल. वर उल्लेख केलेल्या २१२ लाख टन कांद्यातून ३० टक्के घट वजा जाता १६९ लाख टन माल उपलब्ध होतो. त्यातून एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीतील ७८.६ लाख टन मागणी लक्षात घेता जवळपास ९० लाख टन माल एक ऑक्टोबरला कॅरीफॉरवर्ड होतो. तो ही ऐन खरीपाच्या तोंडावर. 

(लेखासाठी वाणिज्य मंत्रालयकृत डीजीएफटी, केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालय यांच्याकडील माहितीचा आधार घेतला आहे.) 

(लेखक शेतमाल बाजार अभ्यासक आहेत.) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com