पवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे मूलद्रव्य होतेय विकसित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन पवनचक्क्यांच्या टर्बाईनची झीज मोठ्या प्रमाणात होते. वातावरणातील घटकांचा प्रतिरोध करण्याची क्षमता असलेले नवीन मूलद्रव्य स्पेन येथील संशोधकांनी तयार केले जात आहे. स्पेन येथील युनिव्हर्सिदाड जौमी आय येथे दी एअरो एक्स्ट्रिम प्रोजेक्ट सुरू आहे. या सिमेन्स गॅमेसा कंपनीच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये स्पॅनिश अर्थ, उद्योग आणि स्पर्धात्मकता मंत्रालयाने आर्थिक निधी पुरवला आहे. 

हरित उर्जेच्या निर्मितीसाठी युरोपसह जगभरातील देश पुढे येत आहे. विंड युरोप ने दिलेल्या माहितीनुसार, खनिज इंधनाला हरित पर्याय शोधून, ५१ टक्क्यापेक्षा अधिक ऊर्जा मिळवण्याचे ध्येय या देशांनी ठेवले आहे. त्यातून पवन ऊर्जा ही लोकप्रिय होत आहे. मोठ्या आकाराच्या पवनचक्क्यांचे प्रकल्प उभारले जात आहे. मात्र, अशा प्रकल्पामध्ये टर्बाईन व पात्यांची सातत्याने वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यातून येणाऱ्या मातीच्या कणांमुळे झीज होते. 

कमाल व किमान तापमान, धूळ, अतिनिल किरणे यांचाही सामना करावा लागतो. पाते आणि त्याबरोबर आतमध्ये फिरणारा आस यांच्या निर्मितीसाठी योग्य मूलद्रव्यांच्या निर्मितीला स्पेन येथील संशोधकांनी प्राधान्य दिले आहे. प्रकल्पातील मुख्य संशोधक विसेन्टे सॅन्झ यांनी सांगितले, की अब्जांशी तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि आंतरविद्याशाखीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ एकत्र आले असून, नव्या मूलद्रव्याची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे वातावरणातील विविध घटकांमुळे होणारी झीज बऱ्याच अंशी कमी करणे शक्य होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Develop a new element that reduces windmills

टॅग्स