फळे-भाजीपाल्याची थेट विक्री पोहोचली १९ कोटींवर

प्रतिनिधी
Sunday, 22 November 2020

फळे भाजीपाला पुरवठादार शेतकरी, गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत थेट ग्राहकांना सुरू असलेली फळे भाजीपाला विक्रीची उलाढाल १९ कोटी ६७ लाखांवर पोहोचली आहे.

औरंगाबाद - जिल्ह्यातील फळे भाजीपाला पुरवठादार शेतकरी, गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत थेट ग्राहकांना सुरू असलेली फळे भाजीपाला विक्रीची उलाढाल १९ कोटी ६७ लाखांवर पोहोचली आहे.

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

लॉकडाउनमध्ये २९ मार्चपासून जवळपास ७७ शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फळे व भाजीपाल्याची औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये थेट विक्री सुरू केली. २९ मार्च ते १९ नोव्हेंबरदरम्यान या थेट विक्रीच्या प्रक्रियेतून जवळपास १९ कोटी ६७ लाख ७४ हजार १७२ रुपयांची उलाढाल झाली. जवळपास ९० लाख ९५ हजार ७७३ किलो भाजीपाला व ७४ लाख १३ हजार ७२३ किलो फळांची तसेच २७०० किलो धान्य व इतर शेतीमालाची विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

उलाढालीत तालुकानिहाय विक्रीमध्ये औरंगाबाद तालुक्यातील २ कोटी ३१ लाख १७ हजार ७१० रुपये, पैठणमधील १ कोटी ९२ लाख ४२ हजार ९२७ रुपये, फुलंब्रीमधील १ कोटी ३४ लाख ८८ हजार ९५२ रुपये, वैजापुरमधील १ कोटी ५७ लाख ४२ हजार ८१९ रुपये, गंगापूरमधील ३ कोटी ३६ लाख ५७ हजार ६१० रुपये, खुलताबादमधील ८९ लाख २७ हजार ३१० रुपये, सिल्लोडमधील १ कोटी ७२ लाख ४३ हजार ३२७ रुपये, कन्नडमधील १ कोटी ६३ लाख १० हजार ९७० रुपये, सोयगावमधील १ कोटी २१ लाख ३० हजार ६६४ रुपये इतक्या उलाढालीचा समावेश असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

तीन दिवसांत मोठी उलाढाल
१७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ४६ हजार २० किलो भाजीपाला व ३४ हजार ९०० किलो फळांच्या तसेच २७०० किलो धान्य व इतर शेतीमालाच्या विक्रीतून १ लाख ३६ हजार ५६० रुपयांची उलाढाल झाली होती.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct sales of fruits and vegetables reached Rs 19 crore