esakal | तापमानात वाढ होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

तापमानात वाढ होण्याची शक्यता

कमाल तापमान विदर्भात ३.१ अंश सेल्सिअसने, तर कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानातही सरासरीपेक्षा वाढ होईल. 

तापमानात वाढ होण्याची शक्यता

sakal_logo
By
डॉ. रामचंद्र साबळे

आठवडाभर महाराष्ट्रावर १०१०  हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. कमाल तापमान विदर्भात ३.१ अंश सेल्सिअसने, तर कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानातही सरासरीपेक्षा वाढ होईल. 

किमान तापमान मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात ५ अंश सेल्सिअसने, तर कोकण आणि विदर्भात १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभर हवेतील सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान कोरडे राहील.

कोकण 
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ४२ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती

उत्तर महाराष्ट्र 
धुळे, नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत  कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात आग्नेयेकडून तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत  नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा 
कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. औरंगाबाद जिल्ह्यात ते ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश  सेल्सिअसपर्यंत, तर बीड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत किमान  तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे सकाळी सौम्य थंडी जाणवेल. तर दुपारी  उष्ण व कोरडे हवामान राहील. सर्वच जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी आणि दिशा  आग्नेयेकडून राहील.

शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

पश्‍चिम विदर्भ 
अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी, दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. भंडारा जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५७ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ३१ ते ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी राहील. सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला 
करडई पीक फुलोरा अवस्थेत असल्यास, चिलेटेड झिंक व बोरॉनची शिफारशीत मात्रा फवारणीद्वारे द्यावी. त्यामुळे बोंडातील दाण्यांची संख्या आणि दाण्यांचे वजन वाढते.

भेंडी लागवडीसाठी फुले उत्कर्षा, अर्का अनामिका, परभणी क्रांती, अर्का अभय, फुले विमुक्ता या जातींची निवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी १२ किलो बियाणे वापरावे.

फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करावा.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)