शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञान 

पीक परिस्थिती आणि जमीन मोजणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर.
पीक परिस्थिती आणि जमीन मोजणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर.

पिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता शोधणे  तसेच जमिनीतील ओलाव्याचा आढावा घेण्यासाठी सेन्सर आणि मानवरहित हवाई प्रणाली (यूएएस) किंवा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. 

पिकातील अजैविक तणाव, दुष्काळ आणि पौष्टिकतेच्या कमतरता शोधून ड्रोनच्या साह्याने शेती नियोजन करता येते. पिकांची योग्य वाढ होऊन चांगले उत्पादन मिळण्यासाठी बरेच घटक वेळेवर मिळणे महत्त्वाचे असते. वेळेवर पेरणी, खत मात्रा वेळेवर देणे, पिकाच्या संवेदनशील अवस्था ओळखून व जमिनीतील ओलावा पाहून पाणी व्यवस्थापन, तसेच पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर 

  • ड्रोन तंत्रज्ञानामुळे एनडीव्हीआय आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर पीक देखरेख करण्यासाठी करता येतो. शेतीत योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगल्या पिकाची हमी मिळते.
  • रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे पिकांचे आरोग्य परीक्षण करणे सोपे झाले आहे.
  • पिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता शोधणे  तसेच जमिनीतील ओलाव्याचा आढावा घेण्यासाठी सेन्सर आणि मानवरहित हवाई प्रणाली (यूएएस) किंवा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो.
  • सेन्सर आणि मानवरहित हवाई प्रणाली (यूएएस) किंवा ड्रोन तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या प्रतिमांमधून प्राप्त केलेले संकेतक स्वतंत्रपणे वनस्पतींचे विश्‍लेषण करण्यास उपयुक्त ठरतात.  
  • पिके आणि फळबागांमध्ये पाण्याचा ताण आल्यामुळे  त्याचा परिणाम अनेक घटकांवर होतो. या कारणास्तव, प्राप्त आकडेवारीचा अभ्यास आवश्यक आहे. 
  • यूएव्ही तसेच जमिनीवर प्राप्त केलेले बदल सामान्यत: विश्‍लेषणाद्वारे संबंधित असतात.
  • सेन्सरिंग आणि अ‍ॅक्ट्युएशन ड्रोनचा वापर वनस्पतींच्या तणावाची स्थिती आणि पाणी आणि खतांच्या प्रतिबंधात्मक वापराचे मूल्यांकनासाठी उपयुक्त ठरतो.
  • रिमोट सेन्सिंग हे ध्वनिक ऊर्जा किंवा विद्युत चुंबकीय ऊर्जा, विविध वस्तूंनी उत्सर्जित केलेली किंवा प्रतिबिंबित केलेली ऊर्जा शोधते. हे तंत्रज्ञान रोपांचा ताण ओळखण्यासाठी वापरता येते. पिकांसाठी, रिमोट सेन्सिंग उपकरणे सामान्यत: दृश्यमान प्रकाश किंवा प्रकाशसंश्‍लेषणात्मक सक्रिय किरणोत्सर्ग आणि निकटवर्ती प्रकाशाचे वर्णक्रमीय मोजमाप करतात.
  • दूरस्थ सेन्सिंग तंत्र जसे की उपग्रह प्रतिमांचा वापर करून मोठ्या क्षेत्रावर पीक लागवडीमध्ये होणारे बदल लक्षात घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.  
  • योग्य रिमोट सेन्सिंग तंत्राच्या वापरासह आपण वनस्पतींच्या वाढीतील बदलांची माहिती नोंदवू शकतो. रिमोट सेन्सिंगचा वापर सामान्य माहिती गोळा करणे तसेच पिकाच्या आरोग्याशी संबंधित माहिती काढण्यासाठी धोरणांच्या तरतुदीमध्ये केला जाऊ शकतो.
  • पीक देखरेखीसाठी रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर केल्याने रोपांची स्थिती आणि पिकाच्या वाढीचा कल व स्थिती याबाबत विश्‍वसनीय माहिती मिळू शकेल. याव्यतिरिक्त, पीक उत्पादनाची माहितीदेखील जमा करता येते. यासाठी अनेक मॉडेल्स आहेत. उदाहरणार्थ, थेट मॉनिटरिंग मॉडेल्सचा उपयोग नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेबल इंडेक्स (एनडीव्हीआय) सारख्या थेट रिमोट सेन्सिंग निर्देशांकाच्या आधारे पिकांच्या स्थितीचे विश्‍लेषण करता येते.
  • काही पद्धतींमध्ये पिकाचे वर्गीकरण करण्याच्या उद्देशाने उपग्रह प्रतिमांचा वापर करणे, त्यांची व्यवहार्यता आणि आरोग्याची तपासणी तसेच शेती पद्धतींचे परीक्षण करता येते. 
  • एनडीव्हीआय नकाशे पिकांच्या आरोग्याच्या बदलांची माहिती संग्रहित करण्यासाठी वापरतात; जिथे पिकात ताण आहेत त्या संभाव्य क्षेत्रांची ओळख; वेळेवर निर्णय घेण्याच्या उद्देशाने समस्येचे क्षेत्र शोधले जाते. असे नकाशे उपयुक्त असतात, कारण यामध्ये वनस्पतींच्या वाढीमधील फरक स्पष्टपणे दिसतो.
  • विशेषतः पिकांच्या वाढीच्या काळात पिकांच्या वाढीचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य उपग्रह प्रतिमा उपयुक्त ठरू शकतात. साधारणत: वेगवेगळ्या पिकांमध्ये वाढीचे वेगवेगळे चक्र असते, ते पिकाच्या वाढीनुसार बदल दर्शवितात. वनस्पतींच्या वाढीच्या तपासणीत एनडीव्हीआय तंत्रज्ञान उपयोगी ठरते.  

- डॉ. के. के. डाखोरे,  ९४०९५४८२०२ (राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com