आर्थिक नुकसान पातळीनुसारच करा कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रण

Cotton-Worm
Cotton-Worm
Updated on

सध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुस­ऱ्या पंधरवड्यात झालेला सततचा पाऊस व त्यानंतर पावसाने खंड दिला. या वातावरणाच्या स्थितीमुळे कपाशीची पातेगळ, फुले व बोंडांमध्ये ३ ते ४ टक्के ठिपक्याची व अमेरिकन बोंड अळीचा प्रादुर्भाव व तसेच रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण
     पहिल्या टप्प्यात रासायनिक कीटकनाशकाचा प्रथम वापर शक्यतो टाळावा. कारण क्रायसोपर्ला, क्रिप्टोलिमस आदी मित्रकीटकांचा नाश होतो.
१) व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
२) ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम तीव्रता) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
    किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर, फ्लोनिकामीड (५० डब्ल्युजी) ०.४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी. 
    नोव्हेंबर महिन्याच्या आधी कोणत्याही सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटामधील कीटकनाशकांचा किंवा इतर कीटकनाशकांच्या मिश्रणांचा वापर टाळावा.

गुलाबी बोंड अळी एकात्मिक नियंत्रण
    बोंड अळीची अंडी पिकात दिसू लागताच ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या परोपजीवी कीटकाची अंडी १.५ लाख प्रतिहेक्टर या प्रमाणात शेतात सोडावीत. अंडी ४० व ६० व्या दिवशी दोन वेळा सोडावीत.
    कामगंध सापळे (पेक्टीनो ल्यूर) प्रतिहेक्टरी २० या प्रमाणे शेतात लावावेत. त्यात अडकलेले नर पतंग पकडून नष्ट करावेत. सौरउर्जेवर चालणारे सापळे व प्रकाश सापळ्यांचा सुद्धा उपयोग करावा.
    पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी २० या प्रमाणात पक्षिथांबे लावावेत.
    निंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा अॅझाडीरेक्टिन (१,५०० पीपीएम) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी (हेक्टरी २.५ लिटर प्रति १००० लिटर पाणी) या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
    आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर, फवारणी 
    थायोडीकार्ब (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) २ ग्रॅम प्रति लिटर.

आर्थिक नुकसानीची पातळी 
मावा - १५ ते २० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे किंवा १० मावा प्रति पान       
तुडतुडेः २ पिल्ले किंवा प्रौढ प्रती पान       
फुलकिडे - १० पिल्ले किंवा प्रौढ प्रती पान       
पांढरी माशी - २० पिल्ले किंवा ४ ते १० प्रौढ माशी प्रती पान       
हिरवी बोंड अळी ­­- १ अंडी किंवा १ अळी प्रती झाड       
गुलाबी बोंड अळी - १० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त (चाफे, फुले, बोंडे) किंवा
८ पतंग प्रतिसापळा प्रतिदिवस किंवा 
१ अळी  / १० फुले किंवा १ अळी / 
१० बोंडे.     

- डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८, ९४२२१८९८७७ (सहायक कीटकशास्त्रज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com