शिराळ्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

निसर्ग पेटीचे वाटप 
कचरा वर्गीकरणाबरोबर घरच्या घरीच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यास आम्ही सर्व नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे. सर्वांना निसर्ग पेटीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ओला कचरा वाळवून त्याचे खत घरीच तयार होऊ लागले आहे. 
- सुनंदा सोनटक्के, नगराध्यक्षा 

शिराळा, जि. सांगली - शिराळा नगरपंचायतीने आश्रमशाळा आणि नाग स्टेडियम परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र युनिट उभारल्याने दररोज अडीच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याचबरोबरीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीस सुरवात झाली आहे.

नगर पंचायतीने "स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा'' ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याचे काम सुरू केले आहे. कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी, सायकलींचा वापर केला जातो. कचरा उचलताना ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जाते. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आश्रमशाळा येथे ओल्या कचऱ्यासाठी १५ आणि काच, चप्पल, कपडे, प्लॅस्टिक अशा सुक्‍या कचऱ्यासाठी ६ अशी एकूण २१ युनिट तयार करण्यात आली आहेत. सुक्‍या कचऱ्याचे या ठिकाणी वर्गीकरण केले जाते. नाग स्टेडियम येथे ओल्या कचऱ्यासाठी २४ युनिट उभारण्यात आली आहेत. 

 नागरिकांनी ओला, सुका, ई-कचरा वर्गीकरण करावे यासाठी नगरपंचायतीने शाळा, महाविद्यालये, प्रभागनिहाय जनजागृती केली आहे. महिलांसाठी खेळ, पैठणीचा कार्यक्रम घेऊन प्रबोधन केले आहे. 

निसर्ग पेटीचे वाटप 
कचरा वर्गीकरणाबरोबर घरच्या घरीच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यास आम्ही सर्व नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे. सर्वांना निसर्ग पेटीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ओला कचरा वाळवून त्याचे खत घरीच तयार होऊ लागले आहे. 
- सुनंदा सोनटक्के, नगराध्यक्षा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fertilizer from wet waste in shiral sangli district