दुष्काळग्रस्त भाग झाला आहे पाणीदार 

प्रतिनिधी
Tuesday, 29 September 2020

गेल्या महिनाभर झालेल्या सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असली तरी टॅंकरच्या पाण्याने तहान भागवणाऱ्या भागांतही यंदा मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.

नगर - दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी नसल्याने बहुतांश भागातील शेतीही सातत्याने अडचणीत असलेल्या नगर जिल्ह्यात पाच वर्षांत यंदा प्रथमच सप्टेंबर महिन्यात सर्व धरणे फुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांची मिळून सुमारे ७० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या सर्व धरणांत ६८ टीएमसीच्या जवळपास पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या महिनाभर झालेल्या सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असली तरी टॅंकरच्या पाण्याने तहान भागवणाऱ्या भागांतही यंदा मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्याने गेल्या दहा वर्षांत सुमारे सहा वर्षे तीव्र दुष्काळ सोसला आहे. केवळ पाणी नसल्याने काही तालुक्याचा अपवाद वगळता जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीत मोठा आर्थिक फटका सोसला आहे. फळबागाही पाण्याअभावी वाया गेल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजूने संकटात असलेला शेतकरी आर्थिककदृष्ट्या हतबल होता. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाने कधीच सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोल्यातही यंदा दुपटीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. मुळा, भंडादरा, निळवंडे ही धरणे महिनाभरापूर्वी भरली आहे. विशेष करून अनेक वर्षांपासून न भरलेले सीना धरण यंदा सर्वप्रथम भरले. आढळा, भोजापूर, येडगाव, वडज, डिंभे, घोड, मांडओहोळ, सीना, खैरी व विसापूर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुष्काळग्रस्त भाग झाला आहे पाणीदार 
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र यंदा गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मोठ्या, धरणांसोबत सर्वच गावतलाव, पाझर तलाव भरले असून नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असून दुष्काळग्रस्त भाग पाणीदार झाल्याने सुखावला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time in Nagar district all the dams full