मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतार

संतोष मुंढे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मोसंबी आणि डाळिंबाच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही बाजारातील आवकेवर, आलेल्या मालाच्या उचलीवर व त्या अनुषंगाने दरावर परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मोसंबी आणि डाळिंबाच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही बाजारातील आवकेवर, आलेल्या मालाच्या उचलीवर व त्या अनुषंगाने दरावर परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ जुलैला २० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर याच दिवशी ८७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर २००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ ऑगस्टला ८ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ६० क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ ऑगस्टला १५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर ७६ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ ऑगस्टला २८ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर १०९ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ७०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ ऑगस्टला ७ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर १५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाला. ११ ऑगस्टला ३९ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, तर ७६ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला २०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Fluctuations in the price of a pomegranate