हरभऱ्याची १५ क्विंटल हेक्टरी हमीभावाने खरेदी होणार | Farmer News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 gram crop

हरभऱ्याची १५ क्विंटल हेक्टरी हमीभावाने खरेदी होणार

नांदेड : रब्बी हंगामातील अनुकुल हवामान व सिंचनासाठी उपलब्ध पाण्यामुळे नांदेड जिल्ह्यात हरभरा पिकाचे उत्पन्न यावर्षी समाधानकराक झाले आहे. या मुळे हरभऱ्याची १५ क्विंटल हेक्टरी हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या जोरदार पोवसाचा यंदा पिकांसाठी लाभ होत आहे. सिंचनाची सोय झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड केली आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला चार हजार २५० ते चार हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून केंद्र शासनाचा हमीभाव मात्र पाच हजार २३० रुपये मिळत आहे. मात्र राज्य सरकारने गेल्यावर्षीप्रमाणे शेतकऱ्यांकडून हेक्टरी ११.५ क्विंटल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे उत्पादन वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने याला मान्यता देत हेक्टरी १५ सुधारित उत्पादकता निश्चित करण्यास मान्यता दिली आहें.

मागील वर्षाचे उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति हेक्टर ११.५ क्विंटल एवढ्याच हरभऱ्याची विक्री आधारभूत खरेदी केंद्रात करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात या हंगामात निघत असलेले उत्पादन व शासनाने घालून दिलेली मर्यादा यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांच्याशी चर्चा केल्यानंतर या हंगामात पीक कापणी प्रयोगातील निषअपन्न झालेल्या उत्पन्नानुसार वाढ करण्याची त्यांच्याकडे मागणी केली होती. शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर हेक्टरी १५ क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.

Web Title: Gram 15 Quintals Per Hectare Guaranteed Purchase Farmer Consolation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmers Agitationagro
go to top