नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून; दरात वाढ

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून; दरात वाढ

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मागील आठवड्यात मिरचीची ही आवक ११६६ क्विंटल झाली होती. तर या आठवड्यात आवक १३५२ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाला. तर ज्वाला मिरचीला ३००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. येणाऱ्या आवकेत थोड्या फार प्रमाणात चढउतार सुरू होती.

चालू सप्ताहात घेवड्याची आवक ४१६१ क्विंटल होती. आवक वाढल्याने व बाजारपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी झाले. वालपापडीस २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर घेवड्याला ४३०० ते ५००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सप्ताहात गाजराची आवक १६२० क्विंटल झाली. त्यास ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक कमी व दरही कमी राहिला. वाटण्याची आवक सर्वसाधारण होती. एकूण ५५३ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त मिळाला. टोमॅटोला १०० ते ४५० रुपये, वांगी १५० ते ३०० रुपये, फ्लॉवर १३० ते २६० रुपये असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते २०० रुपये प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची ३५० ते ५०० रुपये प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १५० ते ३५० रुपये, कारले ४०० ते ४६५० रुपये, गिलके ३६० ते ४८५ रुपये, भेंडी २५० ते ४८५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाला. तर काकडीला प्रति २० किलोस ३५० ते ५५० रुपये असा दर मिळाला. 

पालेभाज्यांची आवक सर्वसाधारण असल्याने कोथिंबीर ३०० ते २५५० रुपये, मेथी १२५० ते ३००० रुपये, शेपू ४०० ते १३०० रुपये, कांदापात ३५० ते १४०० रुपये, पालक १३० ते १९० रुपये असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले. इतर पालेभाज्यांचा तुलनेत मेथीला चांगला दर मिळाला. कांद्याची आवक ११४१३ क्विंटल आवक झाली. मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com