कोल्हापुरात ओला वटाणा ६०० ते ६५० रुपये दहा किलो

राजकुमार चौगुले
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात ओला वटाण्यास दहा किलोस ६०० ते ६५० रुपये दर मिळाला. वरणा, हिरवी मिरचीचे दर समाधानकारक होते. वरण्यास दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. हिरवी मिरचीस दहा किलोस १०० ते २५० रुपये दर होता. वाढत्या उन्हाळ्यामुळे बहुतांशी भाजीपाल्यांच्या आवकेत घट झाली. टोमॅटोची दररोज एक ते दीड हजार कॅरेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ८० रुपये दर होता. गेल्या महिन्याच्या तुलनेत टोमॅटोच्या दरत काहीशी सुधारणा असली, तरी आवक वाढल्यास दर पुन्हा घसरत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. टोमॅटोच्या दरात अगदी थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. 

वांग्याची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक होत आहे. वांग्यास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यात बहुतांशी करून ढगाळ हवामान व उष्णतेचे प्रमाण मोठे आहे. परिणामी, वांग्याचे व्यस्थापन करताना शेतकऱ्यांना अडचण होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परिणामी वांग्याच्या आवकेतही अनियमितता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर काकडीची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक सुरू आहे. काकडीस दहा किलोस ५० ते १६० रुपये दर मिळत आहे. गाजराची दररोज शंभर पोती आवक होत आहे. गाजरास दहा किलोस ५० ते १५० रुपये दर मिळत आहे. 

कोथिंबिरीच्या दरातही गेल्या सप्ताहाच्या तुलनेत विशेष सुधारणा झाली नाही. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ८०० रुपये दर मिळत आहे. मेथीची दररोज तीन ते चार हजार पेंढ्या आवक सुरू आहे. मेथीच शेकडा ६०० ते ११०० रुपये इतका दर मिळाला. हापूस आंब्याचे दररोज दोन ते चार हजार बॉक्‍स आवक होत आहे. दोन डझनाच्या पेटीस १०० ते ८०० रुपये इतका दर मिळत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur pea 600 to 650 Rs. 10 kg