द्राक्ष बागांमध्ये भुरी, डाऊनी वाढण्याची शक्यता

Grapes
Grapes
Updated on

सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या बदलामुळे द्राक्ष बागेत भुरी आणि डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत अडचणी तयार झाल्या आहेत. सतत ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे तापमानात बदल होत आहे. या बदलामुळे द्राक्ष बागेमध्ये भुरी आणि केवडा रोगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. पावसानंतर थंडी वाढण्याची शक्यता, तसेच वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे भुरीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुरी नियंत्रण
 ज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झालेले नाहीत, अशा बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी फ्लूओपायरम अधिक टेब्यूकोनाझोल ०.५ मिलि प्रति लिटर पाणी किंवा फ्लुओपायरॉक्साइड अधिक डायफेनोकोनॅझोल ०.८ मिलि प्रति लिटर पाणी किंवा सायफ्लूफेनामीड ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
 ज्या बागांमध्ये छाटणीनंतर ५० दिवस पूर्ण झाले आहेत अशा बागांमध्ये किंवा फळधारणा होत असलेल्या बागांमध्ये भुरी नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यू डीजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  
 सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम अधिक अ‍ॅम्पेलोमायसीस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर पाणी यांच्या एकत्रित मिश्रणाची फवारणीदेखील भुरीचे प्रभावीपणे नियंत्रण करू शकते. अ‍ॅम्पेलोमाइसेस क्विसक्वॅलिस हे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे त्याची ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांसोबत फवारणी करू नये.

केवडा (डाऊनी) नियंत्रण 
 ज्या भागामध्ये पावसानंतर धुके व दवाचे प्रमाण वाढलेले आहे त्या भागांमध्ये केवडा (डाऊनी)  बीजाणू पुन्हा सक्रिय होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फळधारणेच्या वेळी केवड्याचा प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष बागेचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अशा वेळी होणारे नुकसान टाळण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागेत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ॲसिड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्ष बागांसाठी डायमेथोमॉर्फ ०.५० ते १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
 द्राक्ष घडांवर डाऊनीचे प्रमाण अधिक असल्यास अशा बागांमध्ये सायझोफॅमिड २०० मिलि प्रति हेक्टरी किंवा ॲमिसुलब्रोम ३७५ मिलि प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणीसाठी हेक्टरी १००० लिटर पाणी वापरावे. दव किंवा धुक्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या भागांमध्ये मॅन्कोझेब ३ ते ४  किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी.

फळकूज नियंत्रण 
अवकाळी पावसामुळे नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर, ओझर या भागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये पाणी साठून फळकूज होण्याची शक्यता आहे. अशा बागांमध्ये मिनरल ऑइल २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी थोडीशी रिमझिम आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ठिबकद्वारे (२ ते ३ लिटर प्रति एकर) द्यावे किंवा द्राक्ष घडांवर फवारणी (५ मिलि प्रति लिटर पाणी) केल्यास फायद्याचे होऊ शकेल.
- ०२०-२६९५६०३२ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com