राज्यात खरबूज ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुण्यात  प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये
पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची सुमारे १ हजार क्रेट आवक झाली हाेती. रमझानचे उपवास सुरू झाल्याने खरबुजाला मागणी वाढली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे आडत्यांनी सांगितले. 

पुण्यात  प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये
पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची सुमारे १ हजार क्रेट आवक झाली हाेती. रमझानचे उपवास सुरू झाल्याने खरबुजाला मागणी वाढली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे आडत्यांनी सांगितले. 

याबाबत बाेलताना आडते साैरभ कुंजीर म्हणाले, रमझानच्या उपवासांमुळे खरबुजाला मागणी वाढल्याने आवकेत देखील वाढ हाेत आहे. सध्या दरराेज सुमारे १ ते दीड हजार क्रेट आवक हाेत अाहे. यामध्ये प्रामुख्याने बॉबी आणि कुंदन जातींचा समावेश आहे. कुंदन वाणापेक्षा बॉबी वाण अधिक रसाळ आणि गाेड असल्याने याला दर अधिक मिळत आहे. बाॅबी वाणाला ३० ते ४० तर कुंदनला २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये
अकोला - येथील बाजारपेठेत खरबूज ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात अाहे. दररोज दोन तीन टन खरबुजाची विविध भागांतून अावक होत अाहे.

मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अकोला बाजारात खरबूज अावक होत अाहे. अाधी संकरित खरबूज हंगाम जोरात झाला. त्यानंतर अाता गावरान खरबूज अधिक प्रमाणात येत अाहेत. उच्च प्रतीचे खरबूज १५०० रुपयांपर्यंत विकले जात अाहे. दुय्यम खरबूज अाठशे ते हजार रुपयांपर्यंत विकत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. किरकोळ बाजारात हे खरबूज सर्रास २५ ते ४० रुपये किलोने ग्राहकांना विक्री होत अाहे. अाणखी १५ दिवस हा खरबूज हंगाम चालणार असून, रमजान महिना सुरू झाल्याने या दरात वाढीची शक्यता सूत्रांकडून वर्तविली गेली.

सोलापुरात प्रति दहा किलोस २०० ते ३०० रुपये
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात खरबुजाची मागणी आणि आवक दोन्ही स्थिर राहिल्याने दरही स्थिरच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. समितीच्या आवारात गतसप्ताहात खरबुजाची आवक केवळ एक-दोन गाड्याच राहिली. खरबुजाची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. खरबुजाला प्रति दहा किलोला किमान ३० रुपये, सरासरी २०० रुपये आणि सर्वाधिक ३०० रुपये असा दर मिळाला. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात आवक रोज एखादी गाडीच राहिली. पण दरामध्येही फारसा फरक झाला नाही, खरबुजाला प्रति दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहात खरबुजाची आवक पुन्हा रोज दोन गाड्यांपर्यंत राहिली. पण दरात सुधारणा झाली नाही. खरबुजाला प्रति दहा किलोस १३० ते २०० रुपये असा दर मिळाला. खरबुजाची मागणी आणि आवकेत फारसा चढ-उतार नसला, तरी मागणी तशी स्थिर राहिल्याने दरात सुधारणा झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते २३०० रुपये
औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची १३० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १००० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीला खरबुजाची २० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ७२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ एप्रिलला १२२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचा दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २ मेला खरबुजाची आवक १३० क्‍विंटल तर दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ मे ला १७ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: melon in the state is 800 to 2500 rupees per quintal