सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर स्थिर

संतोष मुंढे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

या फळांचे दर जवळपास स्थिर होते. दुसरीकडे डाळिंबाच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाले. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सीताफळ, मोसंबी, संत्रा आदी फळपिकांच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाला. या फळांचे दर जवळपास स्थिर होते. दुसरीकडे डाळिंबाच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाले.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २८ ऑक्‍टोबरला २८ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक झाली नाही. १३ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ ऑक्‍टोबरला सीताफळांची ४६ क्‍विंटल आवक झाली. दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

डाळिंबांची आवक ४३ क्‍विंटल, तर दर ३०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० ऑक्‍टोबरला २३ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबाची २८ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ४०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ ऑक्‍टोबरला ३३ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक १३ क्‍विंटल, तर दर  २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याचे दर १६०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबांची २० क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते ६८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

सीताफळाची २ नोव्हेंबर रोजी ३४ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक ४ क्विंटल, तर दर ३००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याला १५०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ७०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ नोव्हेंबरला ५१ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर १२०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक २५ क्‍विंटल, तर दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ३०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peanuts oranges pomegranate prices remained stable