PM Kisan Yojana : कधी मिळणार PM किसान योजनेचा १२ वा हफ्ता;कशी करावी ई-केवायसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm kisan yojana

PM Kisan Yojana : कधी मिळणार PM किसान योजनेचा १२ वा हफ्ता;कशी करावी ई-केवायसी

पुणे : शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा 12 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे हा हफ्ता कधी जमा होणार याबद्दल जाणून घ्यायला शेतकरी उत्सुक आहेत. या योजनेंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वर्षातून 2000 रुपयांचे तीन हप्ते मिळतात.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण 6000 रुपये जमा केले जातात. पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांच्या खात्यावर या आठवड्यात 12 वा हफ्ता जमा होऊ शकतो. या महिन्यातील कोणत्याही तारखेला तुमच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते, ज्याची टाइमलाइन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत सुनिश्चित केली गेली आहे. आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावे लागेल, नाहीतर ते पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात.

12 व्या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान येणं अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर 2022 पर्यंत 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

हेल्प लाइन नंबर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे कळू शकेल की कोणाचा पुढील हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे. 155261 हा नंबर असून त्यावर शेतकरी कधीही कॉल करू शकतात.

ई-केवायसी करावी लागेल

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसीची ही अंतिम मुदत संपली असली तरही ई-केवायसीची सुविधा सुरूच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही.

तुम्ही याप्रमाणे ई-केवायसी करू शकता

सर्वप्रथम अधिकृत शेतकरी पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा आणि येथे 'e-KYC' पर्यायावर क्लिक करा.आता तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाका. असे केल्याने तुमचे ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.