बाजारात डाळिंबाचे दर दबावात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

सांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

देशात सुमारे अडीच लाख हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. बाजारात हस्त आणि मृग हंगामातील डाळिंब आले आहे. यंदा कमी अधिक पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅकरने पाणी देऊन बागा जगवल्या आहेत. डाळिंबाला अधिक दर मिळतील अशी आशा होती. गेल्यावर्षी स्थानिक बाजारपेठेत डाळिंबाला ३५ ते ५५ रुपये असे दर मिळाले होते. तर निर्यातक्षम डाळिंबाला ११० ते १५० रुपये प्रतिकिलो असा दर भेटला होता. मात्र देशात गतवर्षीपेक्षा डाळिंबाच्या उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढीचा फटका डाळिंबाच्या दरावर झाला आहे. परिमाणी डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. 

प्रक्रिया उद्योगासाठी द्यावी मदत
ज्यापद्धतीने आंबा, स्ट्रॉबेरी या फळांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासन पुढाकार घेतात. त्याच धर्तीवर डाळिंबावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी शासनाने उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण आणि अनुदान द्यावेत. डाळिंबावर प्रक्रिया सुरू झाले तर नक्कीच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील. 

क्षेत्रात वाढ
 राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतील शेतकरी डाळिंब लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यांत डाळिंबाच्या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ५० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. या राज्यातील डाळिंब नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विक्रीला येतात. उत्पादन अधिक झाल्याने डाळिंबाला मागणी कमी असल्याने दर कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

निर्यातही घटली
रेसिड्यू फ्री डाळिंबाला परदेशात मागणी आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे आले. मात्र, इतर परदेशातील डाळिंब बाजारपेठेत कमी दरात मिळू लागली आहेत. त्यामुळे देशातील डाळिंबाची मागणी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये सुमारे १० ते १५ टक्क्यांनी निर्यात घटली असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. तरच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील.
- शकील काझी, भाळवणी, ता.  पंढरपूर, जि.  सोलापूर.

शेतकऱ्यांनी डाळिंबाचे क्षेत्र न वाढवता गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासनाने लहान डाळिंबावर प्रक्रिया उद्योगासाठी मदत केली पाहिजे. तरच डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला फायदा मिळेल.
- अंकुश पडवळे, संचालक, ग्रीन व्हॉरिझन फार्मर प्रोड्युसर कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate farmers have found a financial crisis