पेरूचे दर्जेदार उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादासाहेब कोळपे यांनी ३० गुंठ्यांत फुलवलेली पेरूची बाग.

पुणे शहरापासून जवळ असलेल्या वडकी (ता. हवेली) येथील अनेक शेतकरी गुलटेकडी बाजार समितीत पेरूची विक्री करतात. गावातील दादासाहेब कोळपेदेखील वर्षाला चांगले उत्पन्न मिळवत असून, उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.

पेरूचे दर्जेदार उत्पादन

पुणे शहरापासून जवळ असलेल्या वडकी (ता. हवेली) येथील अनेक शेतकरी गुलटेकडी बाजार समितीत पेरूची विक्री करतात. गावातील दादासाहेब कोळपेदेखील वर्षाला चांगले उत्पन्न मिळवत असून, उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.

पुणे शहरातील गुलटेकडी मार्केट जवळ असल्याने वडकी (ता.हवेली. जि. पुणे) येथील शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे कल आहे. याच गावातील दादासाहेब कोळपे यांची अडीच एकर शेती आहे. त्यात कांदा, ऊस अशी पिके आहेत. तर पेरूचे ३० गुंठे क्षेत्र असून १६० झाडे आहेत.  लखनौ ४९ हे वाण आहे. साधारणपणे २०१३ मध्ये ८० तर अडीच वर्षांपूर्वी उर्वरित झाडांची लागवड केली आहे. एक विहीर आहे. गरजेनुसार ठिबक व पाटपाण्याचा वापर होतो. कोळपे यांनी गुणवत्तापूर्ण पेरू उत्पादनावर भर दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारपेठेत ताज्या मालाला उठाव मिळावा व चांगला दर मिळावा यासाठी सकाळी सातवाजेच्या दरम्यान  काढणीचे नियोजन असते.  पाच ते सहा वर्षांपासून पुणे मार्केटमध्ये विक्री होते. किलोला ३० ते ५० रुपये दर मिळतो. साधारणपणे जून ते डिसेंबर मुख्य हंगाम असल्याने ग्राहकांकडून मागणीही चांगली असते. माग वर्षाला या पिकातून खर्च वजा जाता तीस गुंठ्यात दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. पेरू व्यतिरिक्त कांदा, ऊस, गहू आदींचेही उत्पादन घेतले जाते.  मात्र पेरूची शेती आर्थिक स्थैर्य देण्यात महत्त्वाची ठरल्याचे कोळपे सांगतात.   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे मार्केटला पेरूची मागणी 
गेल्या नोव्हेंबरपासून थंडीत वाढ झाल्यामुळे पेरूचे उत्पादन कमी होत आहे. यामुळे दरांमध्ये प्रति क्रेट   (२२ किलोचे कॅरेट) १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. मात्र उत्पादन व पर्यायाने आवक कमी आहे. येत्या काही दिवस मागणी चांगली राहील अशी अपेक्षा आहे.

आवक व दर 
लखनौ ४९, सरदार-  ५०० ते ७०० रुपये ( प्रति २२ किलो क्रेट) जे विलास, मोठ्या आकाराचा पेरू, तैवान पिंक- ३० ते ४५ रुपये प्रति किलो

वर्षभर विक्री  
पुणे जिल्ह्यातील सासवड, दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यातील जवळपास चार महिने (जून ते सप्टेंबर) महिने शेतकरी उत्पादन घेऊन विक्री करतात. सप्टेंबरनंतर जिल्हातील पेरूची आवक हळूहळू कमी होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर व कोपरगाव भागातून आवक सुरू होते. त्यामुळे पुणे मार्केटमध्ये पेरू तसा वर्षभर पाहण्यास मिळतो. दररोज सरासरी १००० ते १५०० क्रेटची आवक होते. सर्वाधिक आवक ऑक्टोबरमध्ये दिसून येते. या सुरवातीच्या काळात दर साधारणपणे २०० ते ३०० रुपये प्रति क्रेट असतो. सर्व व्यापारी मिळून दर महिन्याला काही लाख रुपयांच्या पुढे उलाढाल होते. मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाचा पेरूच्या दरांवरही परिणाम झाला. त्यातच शाळा बंद असल्याने विक्रीवर बऱ्यापैकी फरक पडला. चालू वर्षी नगरमधील पेरूला सुरवातीच्या जून ते सप्टेंबर या काळात दर कमी होते. उत्पादन कमी झाल्याने दरांतही वाढ झाली. 

खोपोली, लोणावळा भागांतून मागणी 
कोकणातील लोणावळा, खोपोली या भागातील किरकोळ विक्रेत्यांकडून पेरूला चांगली मागणी असते.  चालू वर्षी कोरोनाचे नियम ऑक्टोबरनंतर शिथिल झाले. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. साधारणपणे ४० ते ५० किरकोळ विक्रेते पुणे बाजार समितीत येऊन मालाची खरेदी करत आहेत.

पेरूची वैशिष्ट्ये 

  • अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाणी, कमी खर्चात येणारे पीक
  • रोग व किडींचे प्रमाण अन्य फळपिकांच्या तुलनेत कमी. साहजिकच कीडनाशकांचा वापर कमी.  
  • आरोग्याला लाभदायक
  • वर्षभरात दोन बहार घेणे शक्य
  • पावसाळ्यात नियोजन केल्यास हिवाळ्यात चांगले दर मिळतात  
  • लागवडीनंतर दोन वर्षांपासून व्यावसायिक उत्पादन सुरू होते.
  • योग्य नियोजन व व्यवस्थापनातून व दर चांगले मिळाल्यास एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
  • पुण्यात विक्री करणारे पाच ते सहा व्यापारी.

- दादासाहेब कोळपे  ९८२२२३४७४७

Edited By - Prashant Patil

Web Title: Quality Product Guava

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indapur
go to top