कापूस, हरभरा, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ

Grains
Grains

एक जून २०२० पासून ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी बाजरी, मका, बासमती धान, हळद व गहू यांचे व्यवहार सुरू होतील. तर नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी हरभरा व मूग यांचे आणि डिसेंबर डिलिव्हरीसाठी गवार बीचे तर जानेवारी २०२१ डिलिव्हरीसाठी सोयाबीनचे व्यवहार सुरु होतील. मॉन्सूनची प्रगती समाधानकारक होत आहे. १ जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे.

गव्हाची खरेदी आता जोरात आहे. शासनाची खरेदीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे व गेल्या वर्षाच्या खरेदीचा आकडा या वर्षी ओलांडला गेला आहे. गवार गम व हळद यांची मागणी मात्र अजून वाढत नाही. या दोन वस्तू व गहू वगळता इतर वस्तूंचे (कापूस, हरभरा, सोयाबीन) फ्युचर्स भाव वाढले.  सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सोयाबीन व गवार बी वगळता इतर पिकांच्या ऑगस्ट डिलिवरी किमती अधिक आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या सप्ताहातील NCDEX व MCX मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.
मका 

मक्यामध्ये आता व्यवहार होऊ लागले आहेत. मक्याच्या (जून २०२०) किमती एप्रिल  महिन्यात २३ तारखेपर्यंत घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. १,२४० वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग ) १.३ टक्क्यांनी घसरून रु. १,२३७ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. बाजारातील किमती सध्या हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे. 

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (जून २०२०) किमती एप्रिल महिन्यात चढ-उतार अनुभवत होत्या (रु. ३,५८६ व रु. ३,८५४ दरम्यान). या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,८२० वर आल्या आहेत. स्पॉट किमती ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,९२७ वर आल्या आहेत. ऑगस्ट डिलिवरी साठी रु. ३,७८२ किमत आहे. ती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.७ टक्क्याने कमी आहे. 

हळद
हळदीच्या फ्युचर्स (जून २०२०) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. ५,९८० ते रु. ५,४०४). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. ५,२७२ वर आल्या आहेत.  ऑगस्टच्या फ्युचर्स किमती रु. ५,३३६ वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट भावापेक्षा (रु. ५,२००) २.६ टक्क्याने अधिक आहेत.

गहू 
गव्हाच्या जून २०२० डिलिवरी साठी एप्रिल महिन्यात व्यवहार झाले नाहीत.  या सप्ताहात स्पॉट किमती ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,८७९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,९२५ आहे.   

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जून  २०२०) किमती एप्रिल महिन्यात चढउतार अनुभवत होत्या. (रु. ३,२१६ व रु. ३,६४८ दरम्यान).  या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,४७८ वर आल्या आहेत. ऑगस्ट मधील फ्युचर्स किमती रु. ३,४६२ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा (रु. ३,५७५) १.६ टक्क्यांनी कमी आहेत.  

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून  २०२०) किमती एप्रिल महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०३२ ते रु. ४,२८०). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून  रु. ४,१०४ वर आल्या आहेत.  ऑगस्ट मधील फ्युचर्स किमती रु. ४,१६४ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा (रु. ४,०९३) १.७ टक्क्याने अधिक आहेत. हमी भाव रु. ४,८७५ आहे. 

कापूस 
MCX मधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०२०) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. (रु. १७,१५० ते रु. १६,४४०). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. १५,८१० वर आल्या आहेत. ऑगस्टच्या फ्युचर्स किमती रु. १६,२९० वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा (रु. १५,६६९) ४ टक्क्यांनी अधिक आहेत. 

मूग, बासमती धान (Paddy Basmati) व बाजरी यांच्यात अजून व्यवहार होत नाहीत.  
(सर्व किमती प्रति क्विंटल; 
कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).
- arun.cqr@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com