सांगली जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले

(प्रतिनिधी)
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

सांगली - दोन वर्षांपूर्वी पाण्याची कमतरता आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात उसाचे लागवड क्षेत्र ८० हजार ४४९ हेक्‍टर आहे. गतवर्षी ७२ हजार ३५९ हेक्‍टरवर लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गाळप हंगामासाठीच्या ऊस क्षेत्रात सुमारे ८ हजार ९० हेक्‍टरने वाढ झाली आहे. मात्र, दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाल्याने गाळपासाठी स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण १६ साखर कारखाने आहेत. गत वर्षी ७२ हजार ३५९ हेक्‍टरवरील ५१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदाच्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. ऊस टंचाईमुळे दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्‍यातील कारखान्याचे गाळप अवघ्या ३० दिवसांत बंद करावे लागले होते. मात्र, यंदा ही परिस्थिती बदलणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात यंदा उसाच्या क्षेत्रात जरी वाढ झाली असली तरी पाणीप्रश्‍न कायम आहे. 

 स्पर्धा अटळ
जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात ८ हजार हेक्‍टरने वाढ झाली असली तरी कारखाने अखंड सुरू ठेवण्यासाठी कारखान्यांमध्ये ऊसासाठी स्पर्धा होण्याची दाट शक्‍यता आहे. यामुळे हंगाम जरी अजून दोन ते तीन महिने पुढे असला तरी आपल्या कारखान्याला गाळपासाठी अधिक ऊस कसा येईल याकडे कारखान्याचे नियोजन आत्तापासूनच सुरू केले आहे. 

ऊस पट्ट्यात क्षेत्र वाढले
सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, कडेगाव, वाळवा या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. त्याचबरोबर शिराळा तालुक्‍यात यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तासगाव तालुक्‍यात ४४० हेक्‍टरने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे चित्र दिसते आहे. 

 दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात घट
दुष्काळी भागातील आटपाडी, जत तालुक्‍यात प्रत्येकी एक साखर कारखाना आहे. मात्र, या भागात पाणीटंचाईचा फटका ऊस लागवडीस बसला आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी जरी या पट्ट्यात आले असते तरी अद्यापही लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाला पाणी देणे कठीण होत आहे. परिणामी आटपाडी, जत तालुक्‍यात दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sangli news sugarcane