सरपंच ठरले ‘लकी ड्रॅा’चे भाग्यवान विजेते

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते. 

आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड आणि सोनाई पशु आहारच्यावतीने गिफ्ट हॅम्पर ही बक्षिसे कार्यक्रमातील मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सरपंचांना प्रदान करण्यात आली. महापरिषदेत दाखल झालेल्या सरपंचांकडून लकी ड्रॅासाठी फॅार्म भरून घेण्यात आले होते. दोन्ही दिवसांतील प्रत्येक चर्चासत्राच्या दरम्यान हे लकी ड्रॅा विजेते काढण्यात येत होते. लकी ड्रॅाच्या विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर सरपंचांनी जोरदार जल्लोष करीत त्यांचे अभिनंदन केले. 

विक्रम टीच्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचे विजेते - शरद सोनावणे, लाखेफळ, जि. नगर, बाळासाहेब घुले, शेकटे, जि. नगर, बेबीताई बुट्टे -पाटील, वराळे, जि. पुणे, वसंत देशमुख, पूस, जि. बीड, प्रकाश भुवड, घोसाळे, जि. रत्नागिरी, प्रशांत रणदिवे, सारोळा, जि. उस्मानाबाद, राजाराम जाधव, नेर्ले, जि. सिंधुदुर्ग, मुकुंद पुनसे, ममदापूर वणी, जि. अमरावती, बसवराज आरबोळे, तनवडी, जि. कोल्हापूर, राजेंद्र पाटील, दुंडगे, जि. कोल्हापूर, बुधाजी गवारी, हिवरे तर्फे मिन्हेर, जि. पुणे, वनिता राठोड, इंजोरी, जि. वाशीम, केदार उरुणकर, बुधवार पेठ, जि. कोल्हापूर, सागर उपर्वट, शेळद, जि. अकोला.

डॅालिन सिडलर इलेक्‍ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड - पंडित घाडगे, शेलुखुर्द, जि. यवतमाळ, गोविंद माकणे, अलगरवाडी, जि. लातूर, स्नेहा दळवी, पोफळी, जि. रत्नागिरी, अनिल उंदरे, ताबुळगाव, जि. परभणी, रावसाहेब पाटील, आडगाव, जि. जळगाव, अलका सावरकर, निमदरी, जि. अमरावती, शालन कांबळे, कुदनूर, जि. कोल्हापूर, संजय बगाडे, माळेगाव बाजार, जि. अकोला, रावसाहेब पाटील, आडावद, जि. जळगाव, सविता भांगरे, निगडे, जि. पुणे.

सोनाई पशु आहारच्या वतीने गिफ्ट हॅम्पर - यशवंतराव मसराम, बोरी, जि. गोंदिया, तुकाराम डुकरे, खेडुळा, जि. परभणी, शीतल भोईर, पिंपळगाव जोगा, जि. पुणे, जनार्दन सोमवंशी, ताजपूर, जि. लातूर, डॉ. सूरज पाटील, मनारखेड, जि. अकोला, अमोल पाटील, मंद्रुळ कोळे, जि. सातारा, भूषण धनवटे, दात्याने, जि. नाशिक, सुखदेव बाबर, सराफवाडी, जि. पुणे, केदारी तेऊरवाडकर, किडवाड, जि. कोल्हापूर, लहू दरवकर, भिवंडी बोडुखा, जि. जालना.

Web Title: Sarpanch was lucky winners