बदल लक्षात घेऊन पिके घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 May 2020

कापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत. राज्यात बियाण्यांचा तुटवडा नसून सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी उबवण पद्धत वापरून केलेल्या घरगुती बियाण्यांचा वापर करावा. विशिष्ट कंपनीच्यात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

खरीप हंगामासाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. राज्यात सोयाबिनन बियाणांचा पुरेसा साठा आहे. युरियाचा ५० हजार टन अतिरिक्त साठा आहे. या हंगामात २५ हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील. 
- दादा भुसे, कृषीमंत्री

मुंबई - ‘कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी  करावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर, ‘‘कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी  राज्य, देशच नव्हे तर जगाची भूक भागवावी.’’

कापूस खरेदी २० जूनपर्यंत 
राज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत ३४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंत खरेदी केला जाणार आहे. दररोज दोन लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

खरीप हंगाम २०२० नियोजन

 • विविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर
 • सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर
 • बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल
 • अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल 
 • सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर 
 • सोयाबिन बियाणे गरज : १०.५० लाख क्विंटल.
 • सोयाबीन बियाणे उपलब्धता ः ११.२४ लाख क्विंटल

कापूस पिकाखालील प्रस्तिवात क्षेत्र  

 • खत पुरवठा नियोजन - ४० लाख टन 
 • बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी शेतकरी गट - १७ हजार ११४ 
 • पीक कर्जाचे उद्दिष्ट - ४४ हजार कोटी

प्रमुख पिके

 • खरीप :  भात, ज्वारी, बाजरी, 
 • मका,  तूर , कापूस, सोयाबीन, ऊस  
 • रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा

कोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के
सरासरी पर्जन्यमान ११९८ मि.मि.
कोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के
एकूण शेतकरी १.५२ कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take crops with notice of change uddhav thackeray