तुरीचा पेरा गेल्या वर्षीइतकाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (कोजेन्सिस) - देशात यंदा ४३.८ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीही साधारण एवढ्याच क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली होती. यंदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात तुरीचे लागवड क्षेत्र घटले असले, तरी कर्नाटकमध्ये लागवड वाढल्याचे दिसून आले आहे.

देशातील सर्वाधिक तूर उत्पादन करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात यंदा तुरीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.२ टक्के  घटला आहे. तर मध्य प्रदेश या आणखी एका महत्त्वाच्या तूर उत्पादक राज्यात पेरा ३.४ टक्के कमी आहे. परंतु कर्नाटकात तुरीच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल १६.५ टक्के वाढ झाल्याने देशातील एकूण तूर लागवडीतील तफावत भरून निघाली आहे. 

कर्नाटकात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा ९ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार एक जून ते २६ ऑगस्ट या कालावधीत कर्नाटकात ६५७.६ मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा एक टक्के अधिक पाऊस झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tur Plantation Agriculture