पुणे विभागात टंचाईच्या झळा वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

चार जिल्ह्यांतील २८ तालुक्यांत टंचाई; २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये २८० टॅंकरने पाणीपुरवठा
पुणे - विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. या चार जिल्ह्यांच्या २८ तालुक्यांमधील २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २८० टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ६ लाख लोकसंख्या आणि २९ हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी १९० विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुण्यात पाण्याबरोबरच, चाराटंचाई वाढली
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईने सातत्याने वाढत आहे. पाण्याबरोबरच चाराटंचाईही भासू लागण्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील ३६ गावे ४५० वाड्यांमध्ये टंचाई असून, १ लाख ३० हजार लोकसंख्येला ६६ टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, खेड, हवेली तालुक्यात पाणीटंचाई वाढली आहे. 

माण तालुक्यात पाणीटंचाई गडद
सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील ७६ गावे ६४१९ वाड्यामध्ये ७४ टॅंकर सुरू आहेत. विभागात माण तालुक्यात पाणीटंचाई सर्वांत गडद झाली असून, तेथे ५२ गावे, ३९८ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५८ टॅंकर सुरू आहेत. माण तालुक्यातील ९१ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि २५ हजारांहून अधिक जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव आणि फलटण तालुक्यांतही जनावरांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

सांगलीतील पाच तालुक्यांत ७९ टॅंकर
पुणे, सातारा जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. सांगलीच्या पाच तालुक्यांतील ८३ गावे ५५८ वाड्यांमधील सुमारे १ लाख ८२ हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ७९ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यांत पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, जतमधील ३९ गावे ३०९ गावे आणि आटपाडीमधील २३ गावे १७७ गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे. कवठेमहांकाळ, तासगांव, खानापूर तालुक्यातही पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत. यातून दुष्काळी स्थितीची दाहकता स्पष्ट होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Tanker