
श्रीरामपूर : नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारलेले अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी गुटखाविरोधातील मोहिमेला श्रीरामपूरपासूनच सुरुवात करत धडक दिली आहे. बेलापुरात शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता.१०) सायंकाळी छापा टाकून १३ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा आणि पाच लाख रुपयांचा आयशर टेम्पो, असा १८ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.