
पाथर्डी : तालुक्यातील मोहोज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितमध्ये १४ लाख १० हजार ३६९ रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे लेखापरीक्षणातून निष्पन्न झाले आहे.