Ahmednagar News : सहा आमदारांना खासदारकीची लॉटरी; जिल्ह्यातील १४ आमदारांनी लढवली लोकसभा

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत १४ आमदारांनी नशीब आजमावले. त्यामधून सहा आमदारांना खासदारकीची लॉटरी लागली.
14 leader contest ahmednagar lok sabha election 6 leader became mp politics
14 leader contest ahmednagar lok sabha election 6 leader became mp politicsSakal

- नवनाथ खराडे

अहमदनगर : आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत १४ आमदारांनी नशीब आजमावले. त्यामधून सहा आमदारांना खासदारकीची लॉटरी लागली. यामध्ये शंकरराव काळे, बबनराव ढाकणे, प्रसाद तनपुरे, दादापाटील शेळके, तुकाराम गडाख आणि सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे.

शंकरराव काळे पारनेर विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार झाले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेतून काँग्रेसकडून लढले. त्यांनी भाजपचे वसंतराव गुंजाळ यांच्यावर विजय मिळवला. पुन्हा १९९६ लोकसभा लढले. मात्र, यावेळी पराभव पत्करावा लागला.

बबनराव ढाकणे पाथर्डी मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले. अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून १९८४ त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर १९८९ ला बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. दादापाटील शेळके नगर-नेवासे मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले.

१९९६ ला काँग्रेसने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे परवेझ दमानिया यांचा पराभव करत खासदार झाले. प्रसाद तनपुरे राहुरीतून तब्बल पाच वेळा आमदार झाले. १९९८ च्या निवडणुकीतून काँग्रेसकडून ते खासदार झाले. शेवगावमधून तुकाराम गडाख १९९० ला आमदार झाले. १९९६ ला ते अपक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरले.

मात्र, त्यांना यश मिळाले नाही. २००४ ला त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली. त्यावेळी ते निवडून आले. कर्जत मतदारसंघातून सदाशिव लोखंडे तीन वेळा आमदार झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २०१४ आणि २०१९ ला शिवसेनेकडून खासदार झाले.

लोकसभेच्या रिंगणात ८ आमदारांना यश मिळाले नाही. कर्जतमधून एकनाथ निंबाळकर काँग्रेसकडून दोनदा आमदार झाले. निंबाळकरांनी दक्षिणेतून १९८० ची काँग्रेस (यू) कडून लोकसभा लढवली. त्यांचा काँग्रेस (आय) चे चंद्रभान आठरे यांनी पराभव केला. राहुरी मतदारसंघातून १९७२ साली पी. बी. कडू आमदार झाले.

१९६७ ला उत्तरेतून कम्युनिस्ट पार्टीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले. त्यांचा अण्णासाहेब शिंदे यांनी पराभव केला. कडू पुन्हा १९७१ ला रिंगणात उतरले. यावेळी त्यांचा बाळासाहेब विखे यांनी पराभव केला. श्रीरामपूरमधून गोविंदराव आदिक दोनदा आमदार झाले. त्यांनी १९९९ ला काँग्रेसकडून लोकसभा लढवली. त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच मतदारसंघातून भानुदास मुरकुटे तीन वेळा आमदार झाले. २००४ ला शिवसेनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले. मात्र, यश मिळाले नाही.

पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसकडून राजीव राजळे २००४ ला आमदार झाले. २००९ ला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना संधी दिली. मात्र, दोन्ही वेळेस राजळेंचा पराभव झाला.

नगर-नेवासे आणि राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेले शिवाजी कर्डिले यांनाही लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. अहमदनगर शहर मतदारसंघातून कुमार सप्तर्षी १९७८ ला आमदार झाले. त्यांनी १९८९ ला जनता दलाकडून निवडणूक लढवली. ते तिसऱ्या स्थानी राहिले. पुन्हा १९९६ साली ते रिंगणात उतरले. यावेळी ते आठव्या स्थानी फेकले गेले. शहरातून दोनदा आमदार झालेले संग्राम जगताप यांनाही राष्ट्रवादीने २०१९ च्या लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते, मात्र त्यांना यश मिळाले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com