नगर जिल्ह्यातील १५ गावे रात्र जागुन काढत आहेत

राजेंद्र सावंत
Saturday, 28 November 2020

ग्रामीण व डोंगर परीसर असलेल्या भागात बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांचे लाँकडाऊन झाले आहेत.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्याच्या ग्रामीण व डोंगर परीसर असलेल्या भागात बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांचे लाँकडाऊन झाले आहेत. बिबट्याने तिन मुलांचा घेतलेला बळी, चार व्यक्तीवर केलेले प्राणघातक हल्ले, दहा ते पंधरा गावात बिबट्याचे होत असलेले दर्शन यामुळे नागरकामधे भिती आहे. वनविभागाची बिबट्याला पकडण्याची मोहीम थंडावली आहे. गर्भगिरी डोंगर परीसरातील गावे आजही रात्री जागुन काढत आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यात सक्षम आठरे, श्रेया साळवे, सार्थक बुधवंत यांचा बळी बिबट्याने घेतला आहे. कासारपिपंळगाव, भगवानगड तांडा, मढी व पाडळी येथील चार व्यक्तीवर हल्ले करुन गंभीर जखमी केले आहे. मोहोज देवढे, फुंदेटाकळी, शेकटे, येळी, मोहरी, शिरसाटवाडी, मोहटे, करोडी, जोगेवाडी, मानेवाडी, शिरापुर, वृद्धेश्वर, कासरपिपंपळगाव, पाडळी, चितळी, दिंडेवाडी, कोरडगाव या भागात बिबट्यांचा वावर आहे.

जेथे बिबट्या नागरीकांनी पाहीला तेथील लोकांनी वनविभागाला कळविले आहे. अनेक भागात पिंजरे लावलेले नाहीत. वनविभागाचे कर्मचारी येतात व तरस असेल अशी समजुत काढुन निघुन जातात. सध्या शेतामधे कापुस वेचणीचे काम सुरु आहे. शाळा सुरु नसल्याने लहान व शाळकरी मुले शेतात कापुस वेचणीचे कामे करतात. बिबट्याचा धोका जास्त लहान मुलांना संभवतो. 

लोहसर येथील संयुक्त वनव्य़वस्थापन समिती स्वतःचे बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे तयार करुन घेणार आहे. डोंगर परीसर असल्याने बिबट्याचा धोका जास्त असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या भरवस्यावर थांबुन चालणार नाही.आपली काळजी आपणच घेतली पाहीजे असे माजी सरपंच अनिल गिते यांनी सांगितले. 

पाथर्डी व शेजारच्या आष्टी तालुक्यात बिबट्याने पाच बळी घेतले आहेत. वनविभागाची बबिट्याला पकडण्यासठी आलेले पथके पुन्हा परतली आहेत. आता बिबट्याचा मानवी हल्ला झाला तर वनविभागाच्या अधिका-यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध गुनेह दाखल केले पाहीजेत. वनविभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडु शकत नाहीत. आम्ही वनविभागाच्या विरुद्ध तीव्र अंदोलन करु, असे मुंकुंद गर्जे यांनी सांगितले.

तालुक्यात सुमारे विस पिंजरे लावलेले आहेत. बिबट्यापासुन नागरीकांनी सावंध राहण्याविषयी जनजागृती आमचे कर्मचारी करीत आहेत. डोंगराचा परीसर असल्याने व बिबट्ला इतर खाद्य मिळत असल्याने ते पिंज-याकडे येत नाहीत. तुर व कपाशीच्या पिकामुळे त्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. नागरीकांनी सावध रहावे. बिबट्यांना पकडण्याचे काम सुरुच आहे, असे वनपरीक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवने यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 villages in Nagar district are waking up at night